धर्मस्वातंत्र्य विधेयकाला समर्थन अन् विरोधाची बाधा; पुढील आठवड्यात वादळी चर्चा होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2026 11:35 IST2026-03-15T11:34:18+5:302026-03-15T11:35:16+5:30

सत्तारूढ महायुतीतील भाजप आणि शिंदेसेनेचे या विधेयकाला पूर्ण समर्थन असेल. मात्र, हे विधेयक अल्पसंख्याक समाजाला लक्ष्य करण्यास आणल्याचा आरोप सपाचे आ. रईस शेख यांनी केला. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी (अजित पवार) काय भूमिका घेणार हे महत्त्वाचे असेल. 

Support and opposition to the Freedom of Religion Bill; Stormy discussions likely next week | धर्मस्वातंत्र्य विधेयकाला समर्थन अन् विरोधाची बाधा; पुढील आठवड्यात वादळी चर्चा होण्याची शक्यता

धर्मस्वातंत्र्य विधेयकाला समर्थन अन् विरोधाची बाधा; पुढील आठवड्यात वादळी चर्चा होण्याची शक्यता

मुंबई : राज्य सरकारने विधानसभेत मांडलेल्या धर्मस्वातंत्र्य विधेयकावर अधिवेशनाच्या पुढील आठवड्यात वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे. विविध राजकीय पक्ष कोणती भूमिका घेतात याबाबतही उत्सुकता आहे. 

सत्तारूढ महायुतीतील भाजप आणि शिंदेसेनेचे या विधेयकाला पूर्ण समर्थन असेल. मात्र, हे विधेयक अल्पसंख्याक समाजाला लक्ष्य करण्यास आणल्याचा आरोप सपाचे आ. रईस शेख यांनी केला. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी (अजित पवार) काय भूमिका घेणार हे महत्त्वाचे असेल. 

विरोधकांकडे आता लक्ष विरोधी महाविकास आघाडीतील 
तिन्ही घटकपक्ष काय भूमिका घेतात हेही महत्त्वाचे असेल. काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून (शरद पवार) विधेयकाला विरोध करण्याची भूमिका घेतली जाईल.
त्याचवेळी उद्धवसेनेचे आमदार विधानसभेत विधेयकाबाबत काय मत व्यक्त करतात याबाबत उत्सुकता आहे.

Web Title : महाराष्ट्र धर्म स्वतंत्रता विधेयक: समर्थन, विरोध; हंगामी बहस संभव

Web Summary : महाराष्ट्र धर्म स्वतंत्रता विधेयक पर अगले सप्ताह गरमागरम बहस होने की संभावना है। सत्तारूढ़ भाजपा और शिंदे सेना इसका समर्थन करते हैं, जबकि कांग्रेस और राकांपा (शरद पवार) जैसे विपक्षी दल अल्पसंख्यकों को लक्षित करने का आरोप लगाते हुए इसका विरोध कर सकते हैं। सबकी निगाहें अब पार्टियों के रुख पर हैं।

Web Title : Maharashtra's Religious Freedom Bill Faces Support, Opposition; Stormy Debate Expected

Web Summary : Maharashtra's Religious Freedom Bill is set for a heated debate next week. While the ruling BJP and Shinde Sena support it, opposition parties like Congress and NCP (Sharad Pawar) are likely to oppose it, alleging it targets minorities. All eyes are now on the parties' stances.