शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

सुलभा देशपांडे, सावरकरांना जीवनगौरव

By admin | Updated: June 4, 2015 04:27 IST

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने यंदाच्या जीवनगौरव पुरस्कारासाठी मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर आणि ज्येष्ठ अभिनेत्री

मुंबई : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने यंदाच्या जीवनगौरव पुरस्कारासाठी मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर आणि ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडे यांची निवड करण्यात आली आहे. हा सोहळा १४ जून रोजी गो.ब.देवल यांच्या स्मृतिदिनी यशवंत नाट्यमंदिर येथे सायंकाळी ७ वाजता संमेलनाध्यक्षा फैय्याज यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.जीवनगौरव पुरस्काराचे स्वरुप प्रत्येकी रोख पंचवीस हजार रुपये, शाल,श्रीफळ, मानपत्र आणि स्मृतीचिन्ह असे आहे. दरवर्षी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे रंगकर्मींना गौरविण्यात येते. सर्वोत्कृष्ट लेखक पुरस्कारासाठी अनिल काकडे (गोष्ट कळत-नकळत), सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कारासाठी मंगेश कदम (गोष्ट तशी गंमतीची), सर्वोत्कृष्ट व्यावसायिक नाटक पुरस्कारासाठी ‘कळत नकळत’ नाटकाची निवड करण्यात आली आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेता संजय खापरे (जस्ट हलक फुलकं), सर्वोत्कृष्ट अभिनेत्री स्पृहा जोशी (समुद्र), सर्वोत्कृष्ट नेपथ्यकार राजन भिसे (समुद्र), सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना जयदीप आपटे (समुद्र), सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत पियुष-साई (ढॅण्टढॅण), सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता शंशाक केतकर (गोष्ट तशी गंमतीची), सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री ज्ञानदा पानसे, सीमा गोडबोले, सर्वोत्कृष्ट नाट्यव्यवस्थापक पुरस्कारासाठी मामा पेडणेकर यांची निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने यंदा पुरस्कारांची फेररचना केली असून एकूण रंगभूमीच्या सर्वांगाचा विचार करुन ३८ पुरस्कारांची घोषणा केली आहे. सर्वोत्कृष्ट एकत्रापी पुरस्कारासाठी संदीप पाठक, नाट्य परिषद कार्यकर्ता पुरस्कार गुरुनाथ दळवी, नाट्य समीक्षक पुरस्कार शीतल करदेकर, सर्वोत्कृष्ट व्यावसायिक संगीत नाटकासाठी ‘संगीत बया दार उघड’, सवोत्कृष्ट प्रायोगिक ‘संगीत नाटकासाठी संगीत स्वयंवर’, सर्वोत्कृष्ट प्रायोगिक नाटकासाठी ‘न ही वैरेन वैरानी’ यांची निवड करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)