शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
2
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
3
Top Marathi News LIVE Updates: कोलकाता विधानसभा निवडणूक दुसरा टप्पा: दुपारी १ वाजेपर्यंत ६१ टक्के मतदान
4
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
5
Video - "सिलिंडर संपला तर चुलीवर जेवण करशील का?"; नवरदेवाने लग्नात नवरीसमोर ठेवली अट
6
Viral Video: मांजरीला त्रास दिल्यानं आईचा चढला पारा; पोटच्या मुलाला दिली अजब शिक्षा, इंटरनेटवर वाद सुरू!
7
'राजा शिवाजी' नाव कसं ठरलं? रितेश देशमुख म्हणाला, "ही फक्त महाराजांची गोष्ट नसून संपूर्ण .."
8
Tax by Trump: टॅरिफऐवजी आता 'हा' टॅक्स लावणार ट्रम्प; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर नवी चाल, भारतावर काय परिणाम होणार?
9
रशियाच्या मदतीने बांगलादेश 'अणुऊर्जेसाठी' सज्ज! दक्षिण आशियातील तिसरा देश ठरणार
10
Sonam Raghuvanshi : "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई
11
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
12
शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही? बच्चू कडूंचं सूचक विधान 
13
VIDEO: बटण दाबणार कसं? EVM वरील भाजपच्या चिन्हासमोर लावली टेप; पुन्हा मतदान घेण्याची भाजपची मागणी
14
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
15
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
16
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
17
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
18
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
19
कपडे होणार स्वस्त! सरकार ११ टक्के टॅक्स हटवण्याच्या विचारात; इराण संकटादरम्यान कंपन्यांना दिलासा देणार?
20
बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क!
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ पोलीस शिपायाची आत्महत्या कौटुंबिक वादातून

By admin | Updated: May 12, 2015 02:05 IST

गोवंडी पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई कमलाकर धामनकर (४८) यांनी शनिवारी वाशी खाडी उडी घेत आत्महत्या केली. ही आत्महत्या त्यांनी कौटुंबिक

मुंबई : गोवंडी पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई कमलाकर धामनकर (४८) यांनी शनिवारी वाशी खाडी उडी घेत आत्महत्या केली. ही आत्महत्या त्यांनी कौटुंबिक वादातून केली असून याबाबत गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांच्या नातेवाईकांनी केली आहे.चेंबूरच्या खारदेव नगर परिसरात राहणारे धामनकर दोन वर्षांपासून गोवंडी पोलीस ठाण्यात कार्यरत होते. शुक्रवारी नेहमीप्रमाणे रात्रपाळी संपवून ते घराकडे निघाले होते. मात्र दुपारपर्यंत घरी न परतल्याने त्यांच्या कुटुंबियांनी त्यांच्याशी अनेकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्याकडून काहीच प्रतिसाद मिळत नव्हता. अखेर सायंकाळी त्यांनी फोन उचलून थोडा तणावाखाली असून थोड्या वेळात घरी येईल, अशी माहिती दिली. मात्र रात्री उशीरापर्यंत देखील ते घरी परतले नाहीत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी रात्री गोवंडी पोलीस ठाण्यात जाऊन हरवल्याची तक्रार दाखल केली. गोवंडी पोलिसांकडून त्यांचा शोध सुरु असताना रविवारी सकाळी वाशी खाडीजवळ त्यांचा मृतदेह काही रहिवाशांना आढळून आला. त्यांनी ही बाब वाशी पोलीस ठाण्याला कळवल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर वाशी पोलिसांनी घटनेची नोंद करत ही माहिती गोवंडी पोलिसांनी दिली. (प्रतिनिधी)