'मंत्र्यावर बिबटे सोडा', उद्या पाकिस्तानातील लोक मंत्री म्हणून येतील', सुधीर मुनगंटीवारांचा विधानसभेत पारा चढला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 14:58 IST2025-12-12T14:56:09+5:302025-12-12T14:58:24+5:30
Sudhir Mungantiwar Vidhan Sabha Speech: विधानसभेत प्रश्न मांडण्यासाठी भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते. पण, त्या खात्याचे मंत्रीच सभागृहात नव्हते, त्यावरून ते चांगलेच चिडले.

'मंत्र्यावर बिबटे सोडा', उद्या पाकिस्तानातील लोक मंत्री म्हणून येतील', सुधीर मुनगंटीवारांचा विधानसभेत पारा चढला!
विधानसभेत अर्धा तास चर्चा काळात विधानसभा तालिका अध्यक्षांनी सुधीर मुनगंटीवार यांचे नाव घेतले. मुनगंटीवार प्रश्न मांडण्यासाठी उभे राहिले, पण सभागृहात संबंधित खात्याचे मंत्रीच नव्हते. त्यावरून मुनगंटीवारांना संताप अनावर झाला. आमदार उपस्थित असताना मंत्री नसेल, तर त्याच्यावर बिबट्या सोडा, असे ते म्हणाले. मुनगंटीवारांनी पाकिस्तानी बनावट पाकिस्तानी सौंदर्य प्रसाधनांच्या मुद्द्यावरूनही सरकारला सुनावले.
विधानसभेत तालिका अध्यक्षांनी मुनगंटीवार यांचे नाव घेतले. 'मुनगंटीवार आहेत का?', असे अध्यक्षांनी म्हणताच, सुधीर मुनगंटीवार म्हणाले, 'आहे, आहे. अहो माझा साईजही मोठा आहे, मी दिसलो पाहिजे. एवढा काही बारीक आहे का?'
मुनगंटीवार म्हणाले, मंत्र्यांवर बिबटे सोडा, हे धंदे बंद करा आता
त्यानंतर तालिकाध्यक्ष म्हणाले, 'पण मंत्री महोदय?' त्यावर मुनगंटीवार म्हणाले, 'मंत्रिमहोदय आणण्याची जबाबदारी आमची नाहीये. तुमची आहे मंत्रिमहोदय आणण्याची जबाबदारी. आम्ही आपले उपस्थित आहोत. आता सभागृहात आमदार उपस्थित असताना मंत्री आला नाही, तर त्याच्या बिबट्या सोडा. हे धंदे बंद करा आता", अशा शब्दात मुनगंटीवार यांनी नाराजी व्यक्त केली.
उद्या पाकिस्तानातील लोक मंत्री म्हणून इथे येतील
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये सौंदर्य प्रसाधनांचा मोठा साठा जप्त करण्यात आला होता. हे साहित्य पाकिस्तानातून आल्याचे तपासातून निष्पन्न झाले. याबद्दल विधानसभेत प्रश्न विचारण्यात आला.
या मुद्द्यावर बोलताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले, "खरंतर तो हरी आम्हाला वाचवेन की नाही, आम्हाला माहिती नाही. पण, नरहरींनी (झिरवळ) आम्हाला वाचवावं. त्यांना ११ लाख प्रतिष्ठाने त्यांच्याकडे आहेत. ९० माणसे आहेत. पैसे दिलेले नाहीत. तुम्ही आता छातीवर हात ठेवून प्रामाणिक उत्तर द्या. आतातर पाकिस्तानची प्रसाधने आलेली आहेत. त्यांनी लोकांचे चेहरे खराब केले आहेत."
"चेहरे खराब करणारे मंत्रालयात बसले आहेत. तुम्हाला नाहक मंत्री म्हणून विधान भवनात मंत्री म्हणून उत्तर द्यायला लावत आहेत. तुम्ही तुमच्या विभागाची जी दुर्दशा आहे, ती एकदा सांगा अन्यथा पाकिस्तान हे आलं आहे, उद्या पाकिस्तानातील लोक मंत्री म्हणून इथे येतील. असे होऊ नये म्हणून तुम्ही माहिती तर द्या. अतिशय तथ्य असणारे उत्तर द्या", असा संतप्त सवाल मुनगंटीवार यांनी मंत्र्यांना केला.