एलजीबीटीक्यूवरील मुनगंटीवार यांचे ‘ते’ विधान अज्ञानापोटी; सोनम कपूरने सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2022 06:11 AM2022-01-02T06:11:45+5:302022-01-02T06:12:21+5:30

विधिमंडळाच्या नुकत्याच पार पडलेल्या अधिवेशनादरम्यान सरकारने विधानसभेत महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा, २०१६ (तिसरी दुरुस्ती) हे सुधारणा विधेयक मांडले होते.

Sudhir Mungantiwar's statement on LGBTQ is Out of ignorance; Sonam Kapoor slam | एलजीबीटीक्यूवरील मुनगंटीवार यांचे ‘ते’ विधान अज्ञानापोटी; सोनम कपूरने सुनावले

एलजीबीटीक्यूवरील मुनगंटीवार यांचे ‘ते’ विधान अज्ञानापोटी; सोनम कपूरने सुनावले

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभा सभागृहात 'एलजीबीटीक्यू ' समुदायाबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल त्यांच्यावर या समुदायाकडून टीका होत असतानाच आता अभिनेत्री सोनम कपूर हिनेदेखील कडक शब्दांत त्यांना सुनावले आहे.

मुनगंटीवार यांनी अज्ञानातून आणि द्वेष भावनेतून ते वक्तव्य केले आहे, असे सोनमने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
विधिमंडळाच्या नुकत्याच पार पडलेल्या अधिवेशनादरम्यान सरकारने विधानसभेत महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा, २०१६ (तिसरी दुरुस्ती) हे सुधारणा विधेयक मांडले होते. विद्यापीठांच्या विविध मंडळांवर या समुदायातील सदस्यांना प्रतिनिधित्व देण्याची तरतूद या विधेयकात आहे. त्यावर बोलताना मुनगंटीवार यांनी सरकारवर सडकून टीका केली होती. 

आता तुम्ही या समित्यांवर समलिंगी लोकांना घेणार आहात का? त्याऐवजी एक संयुक्त वैद्यकीय समिती नाही का स्थापन करता येणार? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले होते. इतकेच नव्हे, तर समलिंगी संबंध म्हणजे जनावरांशी संबंध ठेवणे होय. कुणीही समलिंगी संबंधांची अजून व्याख्या केलेली नाही. जर एखाद्या व्यक्तीने एखाद्या प्राण्याशी संबंध ठेवले असतील तर तो प्राणी येऊन त्याचे प्रमाणपत्र देणार आहे का, अशा शब्दांत त्यांनी आपला विरोध दर्शवला होता.

उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. या समुदायातील सदस्यांसोबत भेदभाव करता येणार नाही, असे खुद्द सर्वोच्च न्यायालयाने अनेक निवाडे देताना स्पष्ट केले आहे, असे त्यांनी निदर्शनास आणून दिले होते.

Web Title: Sudhir Mungantiwar's statement on LGBTQ is Out of ignorance; Sonam Kapoor slam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.