शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

हुश्श !गाडीने पुणे रेल्वे स्थानकात प्रवेश केला, ४१ तासांच्या 'लॉकडाऊन' नंतर विद्यार्थ्यांचा जीव भांड्यात पडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2020 16:28 IST

स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासासाठी दिल्लीत राहिलेल्या सुमारे १३०० हून अधिक विद्यार्थ्यांना आणण्यासाठी विशेष रेल्वेगाडी सोडण्यात आली होती.

ठळक मुद्देदिल्लीत हाल : पुण्यात पहाटे पोहचले विद्यार्थीपुण्यासह सातारा, सांगली, कोल्हापुर, लातुर, उस्मानाबाद, सोलापुर या जिल्ह्यांतील विद्यार्थी

पुणे : दिल्लीत शनिवारी सकाळी १० वाजता सुरू झालेली तपासणी सायंकाळी सहा वाजेपर्यंत चालली. तिथून दोन तास बसने प्रवास करून रेल्वे स्थानकात... सुरक्षित अंतराकडे रेल्वेसह प्रशासनाकचेही दुर्लक्ष... पाच जनरल डब्यात प्रत्येकी ७० हून अधिक विद्यार्थी कोंबलेले... व्यवस्थित बसणेही कठीण...जेवणाची व्यवस्थाही नाही... सकाळपर्यंत रेल्वे डब्यातील पाणीही संपले...गाडी रविवारी दुपारी भुसावळमध्ये आल्यानंतर मदतीचा हात पुढे आले... तब्बल ४१ तासांच्या लॉकडाऊन नंतर पहाटे ३.३० वाजता गाडी पुणे स्थानकात पोहचल्याने सुटकेचा नि:श्वास टाकल्याचे विद्यार्थ्यांनी ‘लोकमत’ला सांगितले. स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासासाठी दिल्लीत राहिलेल्या सुमारे १३०० हून अधिक विद्यार्थ्यांना आणण्यासाठी विशेष रेल्वेगाडी सोडण्यात आली होती. पण गाडीने आलेल्या विद्यार्थ्यांना दिल्लीसह रेल्वेगाडीतही त्रास सहन करावा लागला. ही गाडी शुक्रवारी रात्री १०.१५ वाजता दिल्ली स्थानकातून रवाना झाली होती. भुसावळ, नाशिक, कल्याण या स्थानकांनंतर ही गाडी अखेरच्या पुणे स्थानकावर सोमवारी पहाटे ३.३० वाजता पोहचली. पुण्यासह सातारा, सांगली, कोल्हापुर, लातुर, उस्मानाबाद, सोलापुर या जिल्ह्यांतील सुमारे ४०० हून अधिक विद्यार्थी स्थानकात उतरले. विद्यार्थ्यांची तपासणी करून विशेष बसने मुळ गावी पाठविण्यात आले. त्यांच्या हातावर क्वारंटाईनचे शिक्के मारण्यात आले असून ३१ मे पर्यंत घराबाहेर न पडण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.  विद्यार्थ्यांचा शुक्रवारी सकाळी १० वाजता दिल्लीत सुरू झालेला प्रवास ४१ तासांनी पुण्यात संपला. तरीही अन्य जिल्ह्यांमध्ये गेलेले विद्यार्थी दुपारपर्यंत प्रवासातच होते. त्यांचा लॉकडाऊन ५० तासांहून अधिक होता. काही विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीत शनिवारी सकाळी १० वाजता या विद्यार्थ्यांची ठिकठिकाणी तपासणी सुरू झाली. ही तपासणी सायंकाळपर्यंत सुरू राहिली. यादरम्यान विद्यार्थ्यांना ना पाणी, ना जेवण मिळाले.

त्यांनी आपल्यापरीने जवळच्या दुकानांमध्ये मिळेल ते खाल्ले. पण हा त्रास इथेच संपला नाही. रात्रीचे जेवण रेल्वेकडून दिले जाणार होते. पण स्थानकात पोहचल्यानंतर तिथेही उपवास घडणार असल्याचे स्पष्ट झाले. खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिलेल्या फुड पॅकेटमधील स्नॅक्समुळे काहीसा दिलासा मिळाला. सुरक्षित अंतराचा नियम पाळण्यात आला नाही. स्लीपर कोचमध्ये पुरेशी जागा असतानाही पाच जनरल डब्यांमध्ये प्रत्येकी ७० हून अधिक विद्यार्थी बसविण्यात आले. तिथे सामानासह नीट बसणेही कठीण होते. त्यामुळे काही जणांनी रात्र जागून काढली. तर काहींना खाली झोपावे लागले. गाडीतील पाणीही संपल्याने पुन्हा हाल झाले. अखेर भुसावळमध्ये आल्यानंतर पुढचा प्रवास सुखकर झाला, असे राजेश बोनवटे यांनी सांगितले. -------------------

टॅग्स :Puneपुणेrailwayरेल्वेStudentविद्यार्थीdelhiदिल्लीState Governmentराज्य सरकारCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस