कॉपी घेऊन जाण्यास मज्जाव केल्याने विद्यार्थ्याने दिली आत्महत्येची धमकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2018 15:01 IST2018-04-24T15:00:51+5:302018-04-24T15:01:55+5:30
कॉपी करताना पकडल्याने विद्य़ार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. ही घटना ताजी असतानाच आज परीक्षा केंद्रात कॉपी घेऊन जाण्यास मज्जाव केल्याने विद्यार्थ्याने महाविद्यालयाच्या अकाऊंटटला मारहाण करत आत्महत्या करण्याची धमकी...

कॉपी घेऊन जाण्यास मज्जाव केल्याने विद्यार्थ्याने दिली आत्महत्येची धमकी
औरंगाबाद - कॉपी करताना पकडल्याने विद्य़ार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. ही घटना ताजी असतानाच आज परीक्षा केंद्रात कॉपी घेऊन जाण्यास मज्जाव केल्याने विद्यार्थ्याने महाविद्यालयाच्या अकाऊंटटला मारहाण करत आत्महत्या करण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी विजयेंद्र काबरा समाजकार्य महाविद्यालयात घडला.
विजयेंद्र काबरा समाजकार्य महाविद्यालयात आज एमपीएड परीक्षेचा पहिला पेपर होणार होता. या पेपराला जाताना परीक्षार्थी सतीश राजीव वाघमारे याने कॉपी घेऊन जाण्यास मज्जाव केल्याने अकाऊंटंटच्या कानाखाली लगावली. त्यानंतर दुसऱ्या मजल्यावरून उडी मारण्याची धमकी देत गोंधळ घातला. त्यामुळे हडबललेल्या महाविद्यालय प्रशासनाने पोलिसांना पाचारण केले. सतीश वाघमारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील शारीरिक शिक्षणशास्त्र विभागातील एमपीएडचा विद्यार्थी आहे.