शहरं
Join us  
Trending Stories
1
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
3
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
4
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
5
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
6
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
7
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
8
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
9
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
10
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
11
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
12
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
13
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
14
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
15
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
16
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
17
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
18
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
19
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
20
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
Daily Top 2Weekly Top 5

‘एफडीए’च्या दोषींवर होणार कठोर कारवाई

By admin | Updated: December 24, 2014 02:24 IST

राज्याच्या अन्न आणि औषधी प्रशासन (एफडीए) विभागाचे अधिकारी लाच प्रकरणात दोषी आढळल्यास त्यांच्या विरुद्ध प्रशासन कठोर कारवाई करील

श्रीनारायण तिवारी, मुंबईराज्याच्या अन्न आणि औषधी प्रशासन (एफडीए) विभागाचे अधिकारी लाच प्रकरणात दोषी आढळल्यास त्यांच्या विरुद्ध प्रशासन कठोर कारवाई करील, असा इशारा देण्यात आला आहे. विभागातील कोणत्याही अधिकाऱ्यांनी विनाकारण त्रास दिल्यास विके्रत्यांनी टोल फ्री क्रमांकावर तक्रार करावी, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे़ एफडीएचे आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी विभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या आदेशात त्यांनी कोणालाही लाच मागू नये व पावतीशिवाय कोणाहीकडून पैसे स्वीकारू नयेत असा सल्ला दिला आहे. यानंतरही कोणाविरुद्ध तक्रार आली तर त्याच्या विरुद्ध कठोर कारवाई केली जाईल. अधिकाऱ्यांशी बेकायदेशीर आर्थिक व्यवहार करू नयेत, असेही आवाहन भापकर यांनी विक्रेत्यांना केले आहे. डॉ. भापकर यांच्याकडून देण्यात आलेल्या महत्त्वाच्या आदेशात ‘लोकमत’च्या बातम्यांचा उल्लेख करून लाचखोर अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. भापकर यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रशासनाने ‘लोकमत’च्या मालिकेला खूपच गांभीर्याने घेऊन त्यात उपस्थित केलेल्या मुद्यांची चौकशी केली जात आहे. चौकशीत जे दोषी आढळतील त्यांच्या विरुद्ध कठोर कारवाई केली जाईल. अन्नसुरक्षा कायद्यातील नियमांचे पालन दूध आणि मिठाईच्या व्यापाऱ्यांनी करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. छोट्या व्यापाऱ्यांना केवळ नोंदणी (रजिस्ट्रेशन) करणे आवश्यक आहे व मोठ्या व्यापाऱ्यांनी नियमांनुसार फॉर्म भरणे गरजेचे आहे, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.