शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
3
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
4
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
5
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
6
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
7
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
8
Anushka Sharma ची टीम इंडियात एन्ट्री; पदार्पणाच्या सामन्यात चौथ्या क्रमांकवर बॅटिंगला आली अन्...
9
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
10
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
11
काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत
12
भर वाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
13
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
14
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
15
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
16
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
17
Varun Chakravarthy Record : वैभव सूर्यवंशीची शिकार आणि मिस्ट्री स्पिनर चक्रवर्तीनं साधला 'द्विशतकी' डाव
18
सत्तरीच्या उंबरठ्यावर रोमान्सचा शौक चढला! तरुण गर्लफ्रेंडही मिळाली; पण भेटल्यावर झालं असं काही... 
19
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
20
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणासाठी धनगर समाजाचा रास्ता रोको

By admin | Updated: August 15, 2014 00:42 IST

धनगर समाजाला अनुसूचित जमाती अंतर्गत आरक्षण देण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनांतर्गत गुरुवारी नागपुरातही हजारो धनगर समाजबांधवांनी ‘रास्ता रोको’ करीत

शेकडोंना अटक व सुटका : तासभर वाहतूक विस्कळीत नागपूर : धनगर समाजाला अनुसूचित जमाती अंतर्गत आरक्षण देण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनांतर्गत गुरुवारी नागपुरातही हजारो धनगर समाजबांधवांनी ‘रास्ता रोको’ करीत आरक्षणाची मागणी लावून धरली. दरम्यान तासभर वाहतूक खोळंबली. त्यामुळे शेकडो आंदोलकांना पोलिसांनी अटक केली. धनगर समाजातर्फे आरक्षणाच्या मागणीसाठी मागील काही दिवसांपासून नागपूरसह राज्यभरात सातत्याने आंदोलन सुरू आहे. यापूर्वी साखळी उपोषण सुरू होते. गुरुवारी राज्यस्तरीय रास्ता रोको करण्याचा निर्णय घेण्यात आला. नागपुरात धनगर समाज संघर्ष समितीतर्फे डॉ. विकास महात्मे यांच्या नेतृत्वात वर्धा रोड या राष्ट्रीय महामार्गावरील डोंगरगाव आणि सावनेर रोड टी पॉर्इंटवरील मोहपा या ठिकाणी शेकडोंच्या संख्येने धनगर समाजबांधवांनी रास्ता रोको केला. दुपारी १२.३० वाजता करण्यात आलेल्या या आंदोलनादरम्यान तब्बल तासभर वाहतूक जाम होती. दोन्ही ठिकाणी जवळपास ५०० कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली व काही वेळानंतर सोडून दिले. आंदोलनकर्त्यांनुसार गेल्या ६५ वर्षांपासून धनगर जमातीच्या आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित ठेवण्यात आला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेत अनुसूचित जमातीच्या सूचीमध्ये ३६ व्या क्रमांकावर ओरॉन, धनगर या जमातीचा समावेश केलेला आहे. मात्र तरीही महाराष्ट्रात या आरक्षणाची अंमलबजावणी केली जात नाही. इंग्रजी लिपीत धनगड तर देवनागरीत धनगर असा उल्लेख होतो. केवळ ‘ड’ आणि ‘र’ च्या अक्षरफरकामुळे या समाजास अनुसूचित जमातीच्या सवलतींची अंमलबजावणी करण्यापासून वंचित ठेवलेले आहे. त्यामुळे आपल्या न्याय्य हक्कासाठी आम्ही लढत आहोत. १३ आॅगस्ट २०१४ ला झालेल्या महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी धनगर व इतर समाजासाठी तिसरी सूची तयार करून त्या तिसऱ्या अनुसूचित या समाजाला समाविष्ट करावे, अशी शिफारस करण्याचा ठराव मंजूर केला आहे. परंतु ही बाब धनगर समाजाला अमान्य आहे. आंदोलनात बबनराव लोखंडे, अजय बुधे, अरुण माहुरे, राजेंद्र पाटील, दिलीप डाखोळे, वामन तुरके, देवेंद्र उगे, देवीदास घायवट, शेषराव पडवे, शामराव खुजे, ज्ञानेश्वर घायवट यांच्यासह शेकडो धनगर समाज बांधव सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)