शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

अद्याप 'अभ्यास' सुरू, मराठा आरक्षण कृती अहवाल उद्याच सादर होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2018 12:20 IST

मराठा आरक्षणाबाबत कृती समितीचा अहवाल आज न्यायालयात ठेवण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.

मुंबई - मराठा आरक्षणाबाबत आज एटीएआर म्हणजेच कृती अहवाल आज सभागृहात मांडण्यात येणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांच्यासह कायदेतज्ज्ञ वकिलांची बैठक घेतली. त्यानंतर आजही मराठा आरक्षण कृती अहवाल सभागृहात सादर केला जाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तर, 29 सप्टेंबर रोजी अहवाल सादर होण्याची दाट शक्यता आहे. 

मराठा आरक्षणाबाबत कृती समितीचा अहवाल आज न्यायालयात ठेवण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, मुख्यमंत्र्यांनी आज कायदेतज्ज्ञांची भेट घेऊन या अहवालासंदर्भात माहिती जाणून घेतली. त्यानंतर, हा अहवाल उद्या म्हणजेच गुरुवारी सभागृहात ठेवण्यात येणार असल्याचे समजते. कारण, या अहवालात कुठल्याही कायेदशीर किंवा तांत्रिक त्रुटी राहू नयेत. तसेच या आरक्षणाला कोर्टातही मंजुरी मिळावी, म्हणून अहवालाचा अभ्यास केला जाणार आहे. त्यानंतरच, अहवाल पूर्ण सभागृहात ठेवला जाईल, अशी माहिती आहे. दरम्यान, मराठा आरक्षणासंदर्भात मंत्रिमंडळ उपसमितीची दुपारी बैठक होणार आहे. या बैठकीतील चर्चेनंतर गुरुवारी अहवाल सभागृहात सादर केला जाईल. 

दरम्यान, सरकारने ATR न मांडता पूर्ण अहवालच सभागृहात मांडावा अशी भूमिका विरोधी पक्षांनी घेतली असून विरोधपक्ष त्यावर अडून आहे. काँग्रेस हा अहवालावरच अडून आहे तर राष्ट्रवादी ATR मांडण्यासाठी तयार होत नसल्याचे समजते. दरम्यान, या अहवाल सादरीकरणामुळे सर्वच पक्ष आमदारांसाठी व्हीप काढणार असून आमदारांना पूर्णवेळ सभागृहात बसण्याचा आदेश देण्यात येणार आहे.

टॅग्स :marathaमराठाMaratha Reservationमराठा आरक्षणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसvidhan sabhaविधानसभा