शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
4
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
5
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
6
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
7
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
8
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
9
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
10
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
11
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
12
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
14
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
15
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

चिमुकल्यांवरील अत्याचाराचा कलंक

By admin | Updated: July 23, 2014 00:15 IST

समाजात फोफावत चाललेल्या गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे लहान मुलांचे निरागस बालपण होरपळत जाण्याची विदारक परिस्थिती पुरोगामी महाराष्ट्रातही दिसत आहे.

हिनाकौसर खान-पिंजार  पुणो
समाजात फोफावत चाललेल्या गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे लहान मुलांचे निरागस बालपण होरपळत जाण्याची  विदारक परिस्थिती पुरोगामी महाराष्ट्रातही दिसत आहे. राष्ट्रीय गुन्हे रेकॉर्ड ब्युरोने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार महाराष्ट्र राज्य हे लहान मुलांविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये देशात तिस:या क्रमांकावर आहे. असुरक्षित बालपणासाठी उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश या राज्यांनंतर महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. तर, शहरांनुसार दिल्लीनंतर मुंबईमध्ये सर्वाधिक बाल अत्याचाराचे प्रमाण आहे. 
 मागील वर्षभरात लहान मुलांवर बलात्कार, लैगिंक अत्याचार, अपहरण आणि खून हे प्रकार वाढले असून, राज्यात 6,14क् गुन्हे राज्यात घडले आहेत. मुळात बाल अत्याचारा सारख्या किती तरी गुन्ह्यात पालक पुढे येत नाहीत, तर कितीतरी 
गुन्ह्यात पालकांचे तोंड बंद केले 
जाते. काहीवेळा ‘तडजोड’देखील होते, अशा गुन्ह्यांची तर गणतीच नाही. त्यामुळे सद्य:स्थितीतील दाखल आकडेवारीसुद्धा पुढारलेल्या महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी असून, बाल अत्याचाराची भीषणता स्पष्ट करणारी आहे.
बालकांविरुद्धच्या गुन्ह्यात  प्रलंबित खटल्यांसह पोलीस तपासासाठी दाखल असणारा महाराष्ट्रात तब्बल 8,652 गुन्हे इतका मोठा आकडा असून, याबाबत उत्तर प्रदेशच्या 1क् हजार 375 गुन्ह्यानंतर महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागत आहे. याशिवाय मागील वर्षाअखरे राज्यातील प्रलंबित खटल्यांची परिस्थिती ही इतर राज्यांच्या तुलनेत दयनीय असल्याचे दिसत 
आहे. तब्बल 3 हजार 686 गुन्ह्यांचा पोलीस तपास होऊन निपटारा होणो बाकी आहे.
 याशिवाय 2क्13 मध्ये राज्यातील 22 हजार 262 तक्या खटल्यांची न्यायालयात सुनावणी झाली असून, 
हा देशातील सर्वात मोठा आकडा आहे. यापैकी केवळ 119 खटल्यांमध्ये शिक्षा लागली असून, 875 मध्ये 
आरोपींची सुटका झाली आहे, तर तब्बल 21 हजार 255 खटले प्रलंबित आहेत. 
ही आकेडवारी सकरात्मक व नकारात्मक दोन बाबी दर्शवत आहेत. कायद्याचे ज्ञान वाढले, जागरूकता वाढली, त्यामुळे गुन्हे समोर येत आहेत. न्यायासाठी लढत असल्याचे दिसत आहे. मात्र, दुसरीकडे माराहाणीसारखे प्रकार मोठय़ांच्या अतितणावातून घडत आहेत. ‘पालक-बालक संवादा’च्या अभावातून गुन्हेगारी वाढत आहे. बालकांना आश्वासक वाटण्यासाठी पालकांचे मार्गदर्शन नाही. गुन्हेगारीप्रवत्तीलाच आळा घालण्यासाठी ऊर्जा सकारात्मक वापरण्याचे पर्याय लहानपणापासूनच दिले पाहिजेत. 
- अनुराधा सहस्रबुद्धे, 
संचालिका, ज्ञानदेवी संचलित चाईल्डलाईन.
 
मुंबई दुस:या, पुणो सहाव्या क्रमांकाचे शहर
लहान मुलांविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये शहरांनुसार वेगळ्या केलेल्या आकडेवारीत दिल्लीनंतर मुंबईमध्येही या गुन्ह्यांचे प्रमाण लक्षणीय आहे. दिल्लीत 6,124 गुन्हे, तर मुंबईमध्ये 9क्2 गुन्हे दाखल आहेत. दिल्ली, मुंबई, बेंगलोर, इंदौर आणि रायपूर या शहरांनंतर पुण्यातही गुन्हे वाढीस लागल्याचे चित्र आहे. मागच्या वर्षात पुण्यात 44क् गुन्हे दाखल झाले आहेत.