शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

'स्टीपलिंग आर्ट'

By admin | Updated: June 23, 2015 01:58 IST

चित्रे रंगविण्यासाठी खडू, कलरपेन्सिल्स, जलरंग, स्केचपेन्स, शाईरंग, अ‍ॅक्रेलिक अशा विविध माध्यमांचा वापर केला जातो. हे सर्व वापरून चित्रे रंगविण्याच्याही वेगवेगळ्या

अनुजा पांचाळ -

चित्रे रंगविण्यासाठी खडू, कलरपेन्सिल्स, जलरंग, स्केचपेन्स, शाईरंग, अ‍ॅक्रेलिक अशा विविध माध्यमांचा वापर केला जातो. हे सर्व वापरून चित्रे रंगविण्याच्याही वेगवेगळ्या पद्धती आहेत. जसे की स्टीपलिंग आर्ट, हॅचिंग, स्कम्बलिंग, एम्बॉसिंग इत्यादी. यापैकी 'स्टीपलिंग आर्ट'विषयी जाणून घेऊ. कागदावर असंख्य छोटे बिंदू, दाटीवाटीने तर कधी दूरदूर काढत, या बिंदूंच्या समूहातून साकारलेले चित्र म्हणजेच 'स्टीपलिंग आर्ट'! हे साकारण्यासाठी जे चित्र काढावयाचे त्याची आउटलाइन बिंदूंनीच काढून घ्यावी. मग त्यामध्ये गरजेनुसार कधी जवळ तर कधी दूरवर बिंदू काढत चित्र पूर्ण करावे. बिंदू जितके जवळ तितके चित्र ठळक तर जितके दूर तितके फिकट दिसेल. चित्रामध्ये प्रकाशाचा भास निर्माण करण्यासाठीही ही पद्धत वापरतात. चित्रात ज्या बाजूने प्रकाशाचा आभास निर्माण करायचा असेल तिथे बिंदू विरळ तर बिंदू दाटीने असलेला भाग गडद दिसल्याने तिथे अंधाराचा भास होईल.या आर्टचा वापर कुठेही होतो. कधी रंगीत कलरपेन्सिल्स, स्केचपेन्सनी डॉट्स काढत तर कधी ब्रशने जलरंगांचे थेंब टाकत चित्र रंगवू शकतो. शीसपेन्सिलीने डॉट्स काढत पेन्सिल स्केच करू शकतो तर कधी इंकपेन्सनी अगदी बॉलपेननेसुद्धा डॉट्स काढत 'इंक पेंटिंग' साकारू शकतो. इतकेच काय तर, पेन्सिलीच्या मागे असणाऱ्या खोडरबराला वेगवेगळ्या रंगांत बुडवून, त्यांचे ठसेकाम करत, छोट्या वर्तुळांचेही स्टीपलिंग साकारता येईल.