OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2025 17:45 IST2025-09-28T17:45:17+5:302025-09-28T17:45:40+5:30

Congress Nana Patole News: २१ सप्टेंबरला गोंदियात ओबीसींचे मोठे आंदोलन झाले. ते नाना पटोले यांच्या जिल्ह्यात होते; पण तिथेही ते दिसले नाहीत.

statewide protest for obc reservation but where is the nana patole is silent protest against removal from party state president post or preparation for a new politics | OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 

OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 

Congress Nana Patole News: ऐन गणपतीत मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी मुंबईत ठाण मांडले होते. आझाद मैदानावर येऊन हजारो आंदोलकांनी मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा दिला. यानंतर सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या बहुतांश मागण्या पूर्ण करत जीआर काढले. परंतु, या जीआरला ओबीसी आंदोलकांनी तीव्र विरोध दर्शवला. यानंतर आता ओबीसी समाजाचे आरक्षण टिकण्यासाठी राज्यभरात आंदोलने केली जात आहेत. 

२८ तारखेला बीडमध्ये आमची रॅली आणि सभा होणार आहे. प्रकाश शेंडगे, धनंजय मुंडे यांच्यासह काही जण येणार आहेत. ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहोत. आम्ही त्यात विजय मिळवणार, अनेक याचिका न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत. जिथे जिथे शक्य आहे तिथे आम्ही सभा घेऊ. या लढाईत मागासवर्गीय समाजाचा आम्हाला पाठिंबा आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या संविधानाचे संरक्षण आम्हाला करायचे आहे, असा एल्गार छगन भुजबळांनी केला. परंतु, या सर्व घडामोडीत नाना पटोले कुठे दिसले नाहीत, याबाबत राजकीय वर्तुळात कुजबुज सुरू झाली आहे. 

ओबीसी आंदोलनात नाना पटोले कुठे? 

राज्यात ओबीसींच्या आरक्षणाचा मुद्दा गाजत असताना काँग्रेसचे महाराष्ट्रातील आक्रमक नेते आणि पक्षाचे माजी अध्यक्ष नाना पटोले यामध्ये कुठे आहेत, हा प्रश्न अनेकांना पडला आहे. गेल्या २१ सप्टेंबरला गोंदियात ओबीसींचे मोठे आंदोलन झाले. ते पटोले यांच्या जिल्ह्यात होते; पण तिथेही ते दिसले नाहीत. राज्यात जिथे जिथे आंदोलने पेटली तिथे काँग्रेसचे लहान-मोठे नेते, धाव घेताहेत; पण नानाभाऊ अदृश्य असतात. पक्षाध्यक्ष पदावरून दूर झाल्यानंतरचा त्यांचा हा मूक निषेध की नव्या 'योजने'ची त्यांची तयारी आहे? हे सारेच गुलदस्त्यात आहे; पण त्यांची ही गैरहजेरी कार्यकर्त्यांना नक्कीच खटकणारी असेल.

दरम्यान, सरकारने स्थापन केलेल्या ओबीसी आरक्षणासंदर्भातील उपसमितीमध्ये छगन भुजबळ सदस्य आहेत. सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल काढलेल्या जीआरनंतर छगन भुजबळ नाराज असल्याचे सांगितले जाते.

 

Web Title : ओबीसी आंदोलनों से नाना पटोले की अनुपस्थिति: मौन विरोध या नई रणनीति?

Web Summary : मराठा आरक्षण के खिलाफ ओबीसी आंदोलन तेज होने के बीच, नाना पटोले की अनुपस्थिति सवाल उठाती है। क्या यह पार्टी नेतृत्व से हटाए जाने के बाद मौन विरोध है या किसी नई योजना की तैयारी? राजनीतिक उथल-पुथल के बीच यह अनुपस्थिति ध्यान देने योग्य है।

Web Title : Nana Patole's absence from OBC protests: Silent protest or new strategy?

Web Summary : While OBC protests surge against Maratha reservations, Nana Patole's absence raises questions. Is it a silent protest after his removal from party leadership or a preparation for a new plan? This absence is noticeable amidst the political turmoil.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.