शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
4
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
5
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीचं धक्कादायक कृत्य
6
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
7
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
8
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
9
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
10
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
11
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
12
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
13
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
14
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
15
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
16
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
17
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
18
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
Daily Top 2Weekly Top 5

राज्य महिला आयोगाला न्यायालयीन अधिकार देण्याचा विचार करावा; राज्य सरकारला शिफारस

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 11:32 IST

महिलांवरील अत्याचार आणि हुंडाबळी प्रकरणांबाबत  पावसाळी अधिवेशनात सादर केलेल्या विधिमंडळाच्या महिला व बालहक्क समितीने पहिल्या अहवालात काही महत्त्वाच्या शिफारशी केल्या आहेत.

महेश पवारलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्य महिला आयोगाकडे कौटुंबिक हिंसाचाराची प्रकरणे पोलिस स्टेशनला पाठविण्यापुरतीच मर्यादित जबाबदारी आहे. न्यायिक किंवा तपासणीचे अधिकार नसल्यामुळे आयोगाला मर्यादित कार्यकक्षेत काम करावे लागते, हे कायद्याला अभिप्रेत नाही. यासाठी आयोगाचे सक्षमीकरण देऊन त्याच्या अधिकारांमध्ये बदल व सुधारणा करून न्यायालयीन अधिकार देण्याचा विचार करावा, अशी शिफारस विधिमंडळाच्या महिला व बालकांचे हक्क आणि कल्याण समितीने राज्य सरकारला केली आहे.महिलांवरील अत्याचार आणि हुंडाबळी प्रकरणांबाबत  पावसाळी अधिवेशनात सादर केलेल्या विधिमंडळाच्या महिला व बालहक्क समितीने पहिल्या अहवालात काही महत्त्वाच्या शिफारशी केल्या आहेत. सरकारने आयोगाला दिलेला १० कोटी ६० लाख रुपये निधी कमी आहे. कार्यालयासाठी योग्य आणि पुरेशी जागा उपलब्ध नाही. मर्यादित अधिकारांमुळे प्राप्त तक्रारींवर तातडीने कारवाई होत नाही. पीडितांना मदत व दिलासा देण्यासाठी कोणतेही अधिकार नाहीत. आयोगाने नेमलेले तपास अधिकारी यांना अहवाल देणे बंधनकारक करून त्यावर कालमर्यादा निश्चित करावी, असे समितीने म्हटले आहे. किमान ३ वर्षे कालावधी द्यावा आयोगावर सदस्य सचिव म्हणून आयएएस अधिकारी नेमले जातात. पण बदल्यांमुळे दरवर्षी किमान ३ आयएएस अधिकारी सदस्य सचिव म्हणून बदलले जातात. बाल हक्क आयोग आणि महिला आर्थिक विकास महामंडळाचे अतिरिक्त कामकाजही त्यांच्याकडे असते. परिणामी, अधिकाऱ्यांना पूर्णवेळ काम करता येत नाही, ज्याचा आयोगाच्या कामावर थेट व अप्रत्यक्ष परिणाम होतो. त्यामुळे सदस्य सचिवांचा कार्यकाळ किमान ३ वर्षे करण्यासह त्यांना अतिरिक्त काम न देण्याची शिफारस समितीने केली आहे.

आकृतिबंधाचा प्रस्ताव तत्काळ मंजूर करावा अनेक पदे रिक्त असल्याचा आयोगाच्या कामावर परिणाम होत आहे. सध्या १९९५ पासून ३५ पदांचा आकृतिबंध अस्तित्वात आहे. परंतु गुन्ह्यांची वाढती संख्या पाहता, पदसंख्या वाढविण्याची गरज आहे. सामान्य प्रशासन विभागाकडे ४५ पदांचा आकृतिबंध प्रस्तावित आहे. तो मंजूर करून रिक्त पदे तातडीने भरावीत. समुपदेशन अधिकाऱ्यांची संख्या वाढवावी, सर्व सदस्यांच्या नियुक्त्या तत्काळ कराव्यात. निधी वाढवून आयोगाला स्वतंत्र कार्यालयही द्यावे, असे अहवालात म्हटले आहे.

टॅग्स :women and child developmentमहिला आणि बालविकासMaharashtraमहाराष्ट्र