शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
5
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
6
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
7
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
8
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
9
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
10
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
11
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
12
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
13
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
14
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
15
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
16
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
17
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
18
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
19
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
20
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
Daily Top 2Weekly Top 5

राज काय बोलणार, याचीच राज्यभर चर्चा

By admin | Updated: May 31, 2014 11:40 IST

पुन्हा एकदा राज आणि उद्धव ठाकरे निवडणुकांनंतर एकापाठोपाठ एक कार्यक्रम करत महाराष्ट्रासमोर येत आहेत

अतुल कुलकर्णी , मुंबई -  पुन्हा एकदा राज आणि उद्धव ठाकरे निवडणुकांनंतर एकापाठोपाठ एक कार्यक्रम करत महाराष्ट्रासमोर येत आहेत. ‘या मला आपल्याशी बोलायचं आहे...’ असे भावनिक आवाहन करीत राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील मनसैनिकांना आवाहन केले आहे, तर शिवसेनेने लोकसभेत मिळालेल्या यशाचा जल्लोष साजरा करण्यासाठी येण्याचे आवाहन शिवसैनिकांना केले आहे. लोकसभा निवडणुकीत मनसेला एकही जागा जिंकता आली नाही. शिवाय, मनसेच्या मतांची संख्यादेखील मोठ्या प्रमाणात घटली. त्यामुळे काहीशा नाराज मनसैनिकांपुढे आता पुढे काय, असा प्रश्न उभा राहिला होता. राज यांनी निवडणुकीच्या काळात घेतलेल्या भूमिकेवरदेखील टीकाटिप्पणी झाली. भाजपा-शिवसेनेलादेखील अपेक्षित नसणारा विजय महाराष्टÑात मिळाला. काँग्रेस-राष्ट्रवादीदेखील या मोदी लाटेत भूईसपाट झाले. आम आदमी पक्षालादेखील राज्यात टिकाव धरता आला नाही. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुती एकदम जोषात आलेली असताना मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री व्हायला पाहिजे, अशी भूमिका घेत कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण केला होता. त्यानंतर, स्वत: उद्धव ठाकरे यांनीदेखील शिवसैनिकांना आपण मुख्यमंत्री व्हावे, असे वाटत असल्याचे जाहीर करून राज यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या मागणीची धार कमी करण्याचा प्रयत्न केला होता. राज्यात भाजपा-शिवसेनेची अवस्था फार चांगली होती, असे चित्र कधीच नव्हते. शिवसेनेपेक्षा भाजपाची अवस्था अत्यंत बिकट होती. मात्र, नरेंद्र मोदी नावाच्या टॉनिकने भाजपाचे नेते अवघ्या काही दिवसांत ताजेतवाने तर झालेच आणि आता स्वबळावरची भाषा करू लागले. निवडणुकीच्या निकालानंतर आजपर्यंत राज एकही शब्द माध्यमांशी बोलले नाहीत की, कुठे बाहेरही फारसे दिसले नाहीत. मात्र, त्यांच्या भेटीगाठी आणि चर्चा पडद्याआड चालूच होत्या. आता बदललेल्या राजकीय परिस्थितीत राज ठाकरे उद्या काय भाषण करणार, याचीच उत्सुकता माध्यमांमध्येदेखील आहे. उद्या सोमय्या मैदानावर सायंकाळी ६ वाजता सभा आयोजित करण्यात आली आहे. विधानसभेच्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्याने सगळ्याच पक्षांनी आता कंबर कसल्याचे आणि कुरघोडीचे राजकारण करण्याचे मनसुबे आखल्याचे स्पष्ट होत आहे.