शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
5
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
6
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
7
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
8
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
9
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
10
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
11
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
12
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
13
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
14
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
15
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
16
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
17
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
18
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
19
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
20
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...

पालखी सोहळ्यासाठी राज्याच्या आरोग्य विभागाची जय्यत तयारी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2019 7:00 AM

देहू, आळंदी ते पंढरपूर या मार्गावरील 23 दिवसांची वारी आणि परतीचा 13 दिवसांचा प्रवास याचा विचार करून वारक-यांच्या आरोग्यावर कोणताही परिणाम होऊ नये साठी आरोग्य विभाग विशेष लक्ष पुरवित आहे...

ठळक मुद्देपालखी सोहळ्यासोबतच प्रत्येकी 3 रूग्णवाहिका तर अत्यावस्थ रूग्णसेवेसाठी 108 च्या 72 रूग्णवाहिका तैनात संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावर 10 ग्रामीण रूग्णालये व 15 प्राथमिक आरोग्य केंद्रे

पुणे : पालखी सोहळ्यामध्ये राज्याच्या आरोग्य विभागाने वारक-यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्यावर संपूर्ण लक्ष्य केंद्रित केले आहे. देहू, आळंदी ते पंढरपूर या मार्गावर तज्ञ डॉक्टर आणि प्रशिक्षित कर्मचाऱ्यांमार्फत चोवीस तास बाह्यरूग्ण व मोफत उपचार सुविधा देण्याबरोबरच पालखी मार्गावर प्रत्येक खासगी रूगणालयातील 10 टक्के खाटा राखीव ठेवण्याचे आदेश आरोग्य विभागातर्फे देण्यात आले आहेत. देहू, आळंदी ते पंढरपूर या मार्गावरील 23 दिवसांची वारी आणि परतीचा 13 दिवसांचा प्रवास याचा विचार करून वारक-यांच्या आरोग्यावर कोणताही परिणाम होऊ नये साठी आरोग्य विभाग विशेष लक्ष पुरवित आहे. यासाठी विभागाने सुमारे साडेतीन हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. पालखी व दिंड्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी तीन व एक दिवस आधी धूर फवारणी केली जात आहे. पालखी सोहळ्यासोबतच प्रत्येकी 3 रूग्णवाहिका तर अत्यावस्थ रूग्णसेवेसाठी 108 च्या 72 रूग्णवाहिका तैनात करण्यात आल्या आहेत. पालखी मार्गावर असलेल्या हॉटेल्सची तपासणी करण्यात येत आहे. त्यामध्ये हॉटेलमधील पाणी, अन्नपदार्थांची स्वच्छता व निगा यांचा समावेश आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावर आरोग्यसेवा पुरविणारी 10 ग्रामीण रूग्णालये व 15 प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत तर संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर 9 ग्रामीण रूग्णालये तर 22 प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा देण्यासाठी 595 डॉक्टर, 823 अधिपरिचारिका, 339 प्रयोगशाळा तंत्रज्ञ, 871 आरोग्यसेवक सज्ज करण्यात आले आहेत. गर्दीच्या ठिकाणी रूग्णांना ने-आण करण्यासाठी 50 दुचाकी रूग्णवाहिका सेवेत तैनात ठेवण्यात आल्या आहेत. एकाचवेळी 100 रूग्ण दाखल करता येतील अशी व्यवस्था उपजिल्हा रूग्णालयात करण्यात आली आहे. तसेच उपजिल्हा आणि ग्रामीण रूग्णालयांमध्ये सहा खाटांचे अतिदक्षता विभागही सुरू करण्यात आले आहेत. मोबाईल प्रथमोपचाराची तीन पथके असून, त्यात तज्ञ अधिकारी-कर्मचा-यांचा समावेश आहे, अशी माहिती आरोग्य विभागातर्फे देण्यात आली आहे.

टॅग्स :PuneपुणेHealthआरोग्यPandharpur Wariपंढरपूर वारीGovernmentसरकार