राज्याने ओलांडला १ कोटी चाचण्यांचा टप्पा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2020 06:06 AM2020-11-21T06:06:51+5:302020-11-21T06:07:22+5:30

corona News: कोरोना रुग्णांचा मृत्युदर २.६३ टक्के

The state has crossed the 1 crore corona test stage | राज्याने ओलांडला १ कोटी चाचण्यांचा टप्पा

राज्याने ओलांडला १ कोटी चाचण्यांचा टप्पा

Next

 लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यातील कोरोना चाचण्यांच्या संख्येने एक कोटीचा टप्पा ओलांडला आहे. आजपर्यंत १ कोटी ३५ हजार ६६५ चाचण्या झाल्या. यापैकी १७ लाख ६८ हजार ६९५ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.


सध्या राज्याचा मृत्युदर २.६३ टक्के एवढा आहे, तर दुसरीकडे बरे होणाऱ्यांचे प्रमाणही वाढत आहे. शुक्रवारी ६ हजार ९४५ रुग्ण बरे झाल्याने आतापर्यंत बरे होणाऱ्यांची संख्या १६ लाख ४२ हजार ९१६ झाली आहे. राज्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी होऊन ७८ हजार २७२ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी 
माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.८९ टक्के एवढे झाले आहे.

सध्या राज्यात ५ लाख ५८ हजार ९० व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत, तर ४,८८३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. शुक्रवारी दिवसभरात १५५ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाल्याने राज्यात  आतापर्यंत कोरोनामुळे दगावलेल्यांची संख्या ४६ हजार ५११ झाली आहे. 

Web Title: The state has crossed the 1 crore corona test stage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.