एनटीसी मिल कामगारांना थकीत वेतन देण्यासाठी राज्य सरकार सक्रीय भूमिका घेणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2026 19:44 IST2026-02-28T19:43:07+5:302026-02-28T19:44:32+5:30
Maharashtra Assembly budget session 2026: राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाच्या एनटीसी मिलमधील कामगारांना थकीत वेतन अदा करण्याबाबतचा प्रश्न केंद्र शासनाच्या अखत्यारीत येतो. तथापि राज्य शासन या प्रकरणात सक्रीय भूमिका घेईल, असे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी विधानसभेत सांगितले.

एनटीसी मिल कामगारांना थकीत वेतन देण्यासाठी राज्य सरकार सक्रीय भूमिका घेणार
मुंबई - राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाच्या एनटीसी मिलमधील कामगारांना थकीत वेतन अदा करण्याबाबतचा प्रश्न केंद्र शासनाच्या अखत्यारीत येतो. तथापि राज्य शासन या प्रकरणात सक्रीय भूमिका घेईल, असे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी विधानसभेत सांगितले.
मुंबईतील एनटीसी मिलमधील कामगारांना थकीत वेतन अदा करण्याबाबत विधानसभा सदस्य ज्योती गायकवाड यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी सांगितले की, कामगारांवर अन्याय होऊ नये, त्यांच्या थकीत वेतनासह सर्व देणी वेळेत मिळावीत यासाठी केंद्र आणि राज्य शासन समन्वयाने कार्य करीत आहे. आवश्यकतेनुसार मंत्रालयात बैठक घेऊन अशा सर्व प्रकरणांवर निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी सभागृहात सांगितले.
केंद्र शासनाच्या कामगार विभागाचे उप मुख्य आयुक्त यांच्या स्तरावर राष्ट्रीय मिल मजदूर संघ आणि मॅनेजमेंट यांच्यात तडजोडीसाठी प्रयत्न सुरू आहेत. सुनावण्यांच्या तारखा निश्चित झाल्या असून, त्या माध्यमातून लवकरच निर्णय अपेक्षित असल्याचे कामगार मंत्री फुंडकर यांनी यावेळी नमूद केले. या चर्चेत सदस्य संजय केळकर, दिलीप लांडे यांनी सहभाग घेतला.