शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
3
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
4
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
5
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
6
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
7
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
8
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
9
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
10
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
11
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
12
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
13
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
14
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
15
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
16
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
17
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
18
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
19
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
20
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले

राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता; जयश्री पाटील यांनी दाखल केली कॅव्हेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2021 15:39 IST

Adv Jayashree Patil files caveat before Supreme Court in Anil Deshmukh Case : आयपीएस अधिकारी परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांबाबत १५ दिवसांच्या आत प्राथमिक चौकशी सुरु करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला सांगितले आहे. 

ठळक मुद्देमाजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि ठाकरे सरकार मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्याने जयश्री पाटलांनी कॅव्हेट दाखल केली.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांप्रकरणी याचिकाकर्त्या अ‍ॅड. जयश्री पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केली आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि ठाकरे सरकार मुंबईउच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्याने जयश्री पाटलांनी कॅव्हेट दाखल केली. आयपीएस अधिकारी परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांबाबत १५ दिवसांच्या आत प्राथमिक चौकशी सुरु करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला सांगितले आहे. 

एखादे प्रकरण न्यायालयात येण्याची शक्यता असल्यास पक्षकार आपले म्हणणे मांडण्याची संधी आपल्याला देण्याची विनंती न्यायालयाकडे करतो. कॅव्हेट दाखल झाल्यानंतर या कोणत्याही न्यायालयाकडून संबंधित प्रकरणावर कसल्याही प्रकारची सुनावणी घेतली जात नाही. तसेच याचबरोबरच याच्याशी संबंधित असणाऱ्या पक्षकाराची बाजू ऐकून घेतल्याशिवाय न्यायालय त्याबाबतच्या घेण्यात आलेल्या कोणत्याही निर्णयावर थेट स्थगिती देत नाही. यालाच कॅव्हेट म्हणतात. अशा प्रकारे कॅव्हेट दाखल केल्यास भविष्यात येणाऱ्या प्रकरणात पक्षकाराला आपली बाजू मांडण्याची संधी दिली जाते. ज्यामुळे दोन्हींकडील बाजू ऐकूनच निकाल दिला जातो. सिव्हिल प्रोसिजर कोड १४८ अ अंतर्गत कॅव्हेट फाईल केलं जातं.

अनिल देशमुख यांना राजीनामा देण्यास भाग पाडणाऱ्या जयश्री पाटील आहेत कोण? जाणून घ्या

 

अनिल देशमुख ही मोघलाई नाही, कितीही धमक्या दिल्या तरी मागे हटणार नाही: जयश्री पाटील

 

 

कोण आहेत जयश्री पाटील? 

अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी अ‍ॅड. जयश्री पाटील यांच्यामार्फत मराठा आरक्षणाला विरोध करणारी याचिका दाखल केली. जयश्री पाटील यांनी हायकोर्टापासून सुप्रीम कोर्टापर्यंत मराठा आरक्षणाला विरोध दर्शवला. ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. एल. के. पाटील यांची त्या मुलगी आहेत. जयश्री पाटील यांनी राज्य सरकारच्या मानवी हक्क आयोगाच्या संशोधन विभागाच्या प्रमुख म्हणून सात वर्ष काम पाहिलं. 

सुशांत सिंह राजपूत प्रकरणात देखील दाखल केले होते कॅव्हेट 

अभिनेता सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणी बिहारच्या पोलिस महासंचालकांनी मुंबई पोलिसांवर आगपाखड केली होती. “मुंबई पोलिसांनी 50 दिवसांत काय केलं?” असा सवाल गुप्तेश्वर पांडे यांनी विचारला होता. तर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सुशांत सिंग प्रकरणी चौकशी सीबीआयकडे देण्याची शिफारस करण्याचा निर्णय घेतला. मात्र, महाराष्ट्र सरकारने सुप्रीम कोर्टात गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात कॅव्हेट दाखल केले आहे. राज्य सरकारने सुशांत प्रकरणातील तपासाबाबत आमचं ऐकून घ्यावं आणि मग निर्णय घ्यावा याकरिता कॅव्हेट दाखल केले होते. 

 कायद्यापेक्षा मोठे कुणीही नाही  

मुंबई उच्च न्यायालयात परमबीर सिंग लेटरबॉम्ब प्रकरणी सुनावणी अलीकडेच पार पडली. जयश्री पाटील यांनी यासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका केली होती. त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने याप्रकरणाची चौकशी सीबीआय विभागामार्फत व्हावी, असे निर्देश दिले होते. यानंतर पत्रकारांशी बोलताना जयश्री पाटील यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सडकून टीका केली.  इकडे तुमचे राज्य नसून संविधानाचे राज्य चालते. तुम्ही कायद्यापेक्षा, संविधानापेक्षा मोठे नाही. फक्त माझीच याचिका उच्च न्यायालयाने सुनावणीसाठी घेतली. न्यायायाने माझे खूप कौतुक केले. कोणीतरी एक शूर आहे, जे एवढ्या मोठ्या १०० कोटींच्या प्रकरणात समोर आले, असे न्यायालयाने म्हटल्याची माहिती माहिती जयश्री पाटील यांनी दिली. दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने परमबीर सिंग यांच्यासहित दाखल इतर दोन जनहित याचिका फेटाळून लावत वकील जयश्री पाटील यांच्या याचिकेवर हे आदेश दिले आहेत. न्यायालयाने परमबीर यांची याचिका निकाली काढताना त्यांनी आपल्या तक्रारी संबंधित व्यासपीठासमोर मांडाव्यात, असे स्पष्ट केले होते. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयGovernmentसरकारAnil Deshmukhअनिल देशमुखadvocateवकिलHigh Courtउच्च न्यायालयMumbaiमुंबईPoliceपोलिस