शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठ्यांचे वादळ मुंबईत धडकले, 'एक मराठा लाख मराठा'च्या घोषणांनी वाशी टोल नाका दणाणला
2
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मराठ्यांचं भगवं वादळ मुंबईत दाखल; हजारो आंदोलकांसोबत मनोज जरांगे आझाद मैदानाकडे
3
आजचे राशीभविष्य, २९ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, प्रवास संभवतो, गोड बोलून काम पूर्ण करू शकाल
4
२८०० वाहनांमधून आंदोलक मुंबईत १५ दिवसांचा शिधा घेऊन आलोय; गावनिहाय बांधव मुंबईत, गाडीत राहण्यासह जेवणाची सोय
5
गणेशमूर्ती अर्धवट सोडून पळालेल्या डोंबिवलीतील 'त्या' मूर्तिकाराला अखेर अटक
6
आज लोकसभेच्या निवडणुका झाल्यास कोण बाजी मारणार? भाजपा की काँग्रेस? सर्व्हेतून धक्कादायक आकडेवारी समोर  
7
जरांगेंच्यां आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानावर १५०० हून अधिक पोलिसांची फौज
8
मोदींच्या आईबद्दल अवमानकारक भाषा, काँग्रेस बनला शिवीगाळ करणारा पक्ष; भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांची खरमरीत टीका
9
गुरुजींसाठी नवे वेळापत्रक; गुणवत्ता वाढवा; प्रशासकीय जबाबदाऱ्याही घ्या
10
आंदोलकांची नवी मुंबईत सोय आंदोलकांना मुंबई बाजार समितीचा आधार, दोन मार्केटमध्ये सुविधा, महिलांची स्वतंत्र सोय
11
शक्तिपीठ महामार्गाच्या वर्धा-सांगली टप्प्याला अखेर राज्य शासनाची मान्यता
12
भाजपचे डॅमेज कंट्रोल; फडणवीस यांच्या समर्थनार्थ लागले बॅनर
13
अमेरिकने कितीही दम दिला, तरी उत्पादनात भारताची झेप
14
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
15
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
16
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
17
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
18
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
19
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
20
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना

शक्तिपीठ महामार्गाच्या वर्धा-सांगली टप्प्याला अखेर राज्य शासनाची मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 07:23 IST

Shaktipeeth Highway: नागपूर ते गोवा शक्तिपीठ महामार्गाच्या वर्धा जिल्ह्यातील पवनार ते सांगली या आखणीस राज्य सरकारने मान्यता दिली आहे. आता पुढील मार्गाच्या आखणीचे कामही अंतिम टप्प्यात असून त्याची अधिसूचनाही लवकरच काढली जाणार आहे.

मुंबई - नागपूर ते गोवा शक्तिपीठ महामार्गाच्या वर्धा जिल्ह्यातील पवनार ते सांगली या आखणीस राज्य सरकारने मान्यता दिली आहे. आता पुढील मार्गाच्या आखणीचे कामही अंतिम टप्प्यात असून त्याची अधिसूचनाही लवकरच काढली जाणार आहे.

राज्य सरकारने कोल्हापूरमधील शेतकऱ्यांच्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीपूर्वी शक्तीपीठ महामार्गाची कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ, करवीर, हातकणंगले, कागल, भूदरगढ आणि आजरा तालुक्यातील मार्गाच्या आखणीची अधिसूचना रद्द केली होती. त्यामुळे त्यावेळी या प्रकल्पाला विरोध मावळला होता. आता जूनमध्ये पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रकल्पाला मान्यता देण्यात आली होती. त्यात भूसंपादनसाठी हुडकोकडून १२ हजार कोटी रुपयांचे कर्ज घेण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली होती. आता राज्य सरकारने या प्रकल्पासाठी शासन आदेश जारी पवनार ते सांगली या मार्गास मंजूरी दिली आहे. तर कोल्हापूरमधील शिरोळ, करवीर, हातकणंगले, कागल, भूदरगड आणि आजरा तालुक्यातील आखणीचे सर्व उपलब्ध आणि संभाव्य पर्याय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. या पर्यायांबाबत जिल्ह्यातील मंत्री आणि लोकप्रतिनिधींशी चर्चा करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मार्गाच्या अंतिम आखणीचा निर्णय घेतील, असे जीआरमध्ये म्हटले आहे. शेवटच्या टप्प्यातील मार्गाच्या आखणीचे कामही पूर्ण केले आहे. या मार्गाचे काम अंतिम टप्प्यात असून, लवकरच तो सरकारला सादर केला जाणार आहे, असे एमएसआरडीसीतील अधिकाऱ्यांनी नमूद केले.

 १५० हून अधिक गावांची एमएसआरडीसीतर्फे मोजणीएमएसआरडीसीने वर्धा ते सांगलीदरम्यानच्या ३७० गावांपैकी १५० गावांतील जमीनीची संयुक्त मोजणी पूर्ण केली आहे. उर्वरित गावांच्या मोजणीचेही काम युद्धपातळीवर सुरू असून, ही मोजणी प्रक्रिया पूर्ण होताच भूसंपादन सुरू केले जाणार आहे. त्यानंतर या प्रकल्पाची निविदाप्रक्रिया राबविली जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

प्रकल्पाची वैशिष्ट्येनागपूर ते गोवा हे अंतर २१ तासांवरून आठ तासांवर येणार१२ जिल्ह्यातून मार्ग जाणारमार्गाची लांबी ८०२ किमी असेल,या जिल्ह्यातून मार्ग प्रस्तावितवर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंथदुर्ग हे १२ जिल्हे जोडले जातील.

टॅग्स :Shaktipeeth Mahamargशक्तिपीठ महामार्गMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार