राज्य कर्मचाऱ्यांचा मंगळवारपासून संप, विविध संघटनांचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2018 05:22 IST2018-08-03T05:22:09+5:302018-08-03T05:22:28+5:30

राज्य सरकारी कर्मचारी आणि अधिकारी विविध मागण्यांसाठी ७, ८ व ९ आॅगस्ट रोजी संपावर जाणार आहेत.

 State employees' commissions from Tuesday, decision of various organizations | राज्य कर्मचाऱ्यांचा मंगळवारपासून संप, विविध संघटनांचा निर्णय

राज्य कर्मचाऱ्यांचा मंगळवारपासून संप, विविध संघटनांचा निर्णय

मुंबई : राज्य सरकारी कर्मचारी आणि अधिकारी विविध मागण्यांसाठी ७, ८ व ९ आॅगस्ट रोजी संपावर जाणार आहेत.
कर्मचा-यांच्या विविध संघटनांनी आधीच हा निर्णय घेतला असून राजपत्रित अधिका-यांच्या ७२ संघटनांच्या महासंघाने गुरुवारी झालेल्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब केले. सातवा वेतन आयोग तातडीने द्यावा, पाच दिवसांचा आठवडा करावा, निवृत्तीचे वय किमान ६० वर्षे करावे, बालसंगोपन रजा किमान दोन वर्षांची असावी आदी मागण्यांसाठी हा संप असेल.

- राज्यभरातील 17 लाख कर्मचारी संपात उतरणार आहेत.

Web Title:  State employees' commissions from Tuesday, decision of various organizations