शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

महाविद्यालयीन परीक्षेबाबत राज्य समिती करणार सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंशी चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2020 19:50 IST

त्यानंतरच समितीचा अहवाल राज्य शासनाला सादर केला जाणार

ठळक मुद्दे शैक्षणिक वेळापत्रक तयार करण्यासाठी व परीक्षांबाबत निर्देश देण्यासाठी समितीची स्थापना

पुणे:  राज्यातील विद्यापीठमहाविद्यालयीन स्तरावरील परीक्षा कोणत्या पद्धतीने घ्याव्यात याबाबतचा अहवाल देण्यासाठी राज्य शासनातर्फे स्थापन करण्यात आलेल्या समितीतील सदस्य आता राज्यातील सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंशी चर्चा करणार आहेत. त्यानंतरच समितीचा अहवाल राज्य शासनाला सादर केला जाणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व विद्यापीठांच्या व महाविद्यालयांच्यापरीक्षा पुढे ढकलाव्या लागल्या. त्यामुळे राज्यातील विद्यापीठ व महाविद्यालयीन परीक्षा कोणत्या पद्धतीने घ्याव्यात, याचा अभ्यास करून अहवाल देण्यासाठी राज्यपाल व उच्च शिक्षण मंत्र्यांच्या सूचनेनुसार मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुहास पेडणेकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमाळकर, एसएनडीटी विद्यापीठांच्या कुलगुरु शशिकला वंजारी, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर कुलगुरू देवानंद शिंदे, तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ.अभय वाघ, उच्च तंत्रशिक्षण विभागाचे संचालक धनराज माने यांची  समितीचे स्थापन करण्यात आली.

 दरम्यान, विद्यापीठ अनुदान आयोगाने सुद्धा शैक्षणिक वेळापत्रक तयार करण्यासाठी व परीक्षांबाबत निर्देश देण्यासाठी समितीची स्थापना केली होती. त्यामुळे यूजीसीकडून निर्देश प्राप्त झाल्यानंतरच राज्याच्या समितीने काम करण्याचा निर्णय घेतला. दोन दिवसांपूर्वी केंद्र शासन व यूजीसीकडून प्राप्त झालेल्या निर्देशानुसार 1 मे रोजी राज्य शासनाने स्थापन केलेल्या समितीची बैठक घेण्यात आली. त्यात राज्यातील सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंनी संवाद साधून अहवाल तयार करण्याचा निर्णय झाला.

 राज्यातील विद्यापीठ व महाविद्यालयांच्या परीक्षा घेण्यात एकवाक्यता आणण्याच्या दृष्टीने कुलगुरूंची चर्चा करणे योग्य ठरेल. त्यामुळे समितीतील प्रत्येक सदस्याने दोन किंवा तीन कुलगुरूंची चर्चा करावी, असे या बैठकीत निश्चित झाले. त्यानुसार समितीतील सर्व सदस्य कुलगुरूंची चर्चा करून अहवाल राज्य शासनाला सादर करणार आहे. त्यानंतरच राज्यातील विद्यापीठ व महाविद्यालयीन परीक्षा कोणत्या पद्धतीने होणार याबाबत स्पष्टता येणार आहे,असे सुत्रांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेEducationशिक्षणexamपरीक्षाuniversityविद्यापीठUday Samantउदय सामंतcollegeमहाविद्यालयStudentविद्यार्थी