शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

राज्य सरकारने मद्यविक्री सुरू केली, पण पुढे काय होईल याचा विचार केला कुठे ? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2020 17:29 IST

हाताशी असणाऱ्या अपुऱ्या मनुष्यबळात काय करणार : सगळा ठपका पोलीस यंत्रणेवर का ? 

ठळक मुद्देमाजी न्यायाधीश, सरकारी वकील,माजी पोलीस अधिकाऱ्यांनी ठेवले मद्यविक्रीच्या निर्णयावर बोट दारूची दुकाने सुरू केल्यानंतर गर्दी होणारच ही बाब सरकारच्या लक्षात आली नाही काय ?

युगंधर ताजणे - पुणे : दारूची दुकाने सुरू केली मात्र त्यामुळे पुढे होईल याचा विचार सरकारने केला का ? दिवसेंदिवस नागरिकांबरोबर पोलिसांना देखील होणारा कोरोनाचा संसर्ग, त्यांची अपुरी संख्या, यावर कुणी काही बोलत नाही. निर्णयाची अंमलबजावणी करताना त्यासाठी काय पूर्वतयारी करण्यात आली याकडे दुर्लक्ष झाले. दीड महिन्यानंतर दारूची दुकाने सुरू केल्यानंतर गर्दी होणारच ही बाब सरकारच्या लक्षात आली नाही काय ? यासारखे अनेक प्रश्न उपस्थित करून माजी न्यायाधीश, ज्येष्ठ सरकारी वकील आणि माजी पोलीस अधिकारी सरकारच्या मद्यविक्री निर्णयावर बोट ठेवले आहे. मागील काही दिवसांपासून कंटेन्मेंट भाग वगळता शहरात सुरू केलेल्या मद्यविक्रीने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उभा राहिला आहे. यात 'सुरक्षित अंतर' ठेवण्यात नागरिकांना अपयश आल्याने संसर्गाची भीती आणखी वाढली आहे. याविषयी अधिक माहिती देताना ज्येष्ठ आणि माजी सरकारी वकील नीलिमा वर्तक म्हणाल्या, एक महिला म्हणून सरकारच्या या निर्णयाकडे पहायचे झाल्यास दारुवरील बंदी उठवणे चुकीचे आहे असे म्हणावे लागेल. कायद्याच्या दृष्टीकोनातून बोलायचे झाल्यास, कुणी काय खावे, प्यावे आणि कसे राहावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. त्यादृष्टीने राज्याने बंधने ठेवणे चुकीचे होईल. दारूबंदी असून देखील गुजरात मध्ये सर्वाधिक दारू विकली जाते. ही वस्तुस्थिती आहे. तामिळनाडू मध्ये देखील तोच प्रकार आहे. लॉकडाऊनच्या काळात दारूबंदी उठवणे यामुळे पोलीस यंत्रणेवर जास्त ताण देतो आहे. प्रत्येक ठिकाणी पोलिसांना दोष देणे चुकीचे आहे. 

सध्याच्या काळात एकाएकी सगळी मद्यविक्रीची दुकाने उघडल्यास त्याठिकाणी मोठया रांगा लागतात. फिजिकल डिस्टन्सचा प्रश्न उपस्थित होतो. अशावेळी तिथे किती पोलीस कर्मचारी आहेत? सुरक्षा व्यवस्था कशी आहे ?यावर प्रश्न उपस्थित करणे चुकीचे आहे. जवळपास शहरातील प्रत्येक लेनमध्ये एक दारूचे दुकान आहे. तेव्हा त्यांना किती मनुष्यबळ लागणार आहे याचा अंदाज घेणे आवश्यक होते. एखादे धोरण ठरवताना त्याचा अगोदर विचार करणे गरजेचे आहे, यंत्रणेवरचा ताण लक्षात घ्यायला हवा. दारू हेच केवळ कौटुंबिक हिसांचाराचे कारण नाहीत त्याला सामाजिक, आर्थिक, मानसिक तसेच वर्चस्ववादी भूमिका असेही कारणे आहेत. सरकार केवळ दारूचाच विचार करणार असेल तर ते चुकीचे आहे.................................... म्हणून पोलीस आणि नागरिक यांच्यात संघर्ष.. पोलीस हे आपली भूमिका व्यवस्थित बजावत आहेत. सध्या त्यांच्यावर टीका करण्यासारखी परिस्थिती नाही. आता त्यांच्यातीलच काही लोक कोरोनाबाधित आहेत. तेव्हा परिस्थिती अधिक गंभीर आहे. मुळात आता नागरिक पोलिसांना सहकार्य करत नाहीत असे दिसून आले आहे. जे नियम सांगितले जातात त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे पोलीस आणि नागरिक यांच्यात संघर्ष सुरू झाला आहे. नागरिकांची गर्दी ही नेहमीच पोलिसांपेक्षा अधिक असणार आहे. त्यांचा बंदोबस्त करताना नागरिक भडकणार नाहीत आणि फिजिकल डिस्टन्स ठेवणे याबाबत काळजी पोलीस घेत आहेत. यात ते निष्काळजीपणा करतात असे म्हणता येणार नाही. यापुढे अतिशय कडक आणि शिस्तीत नियम अंमलात आणावे लागणार आहेत. - पी.बी. सावंत (माजी न्यायाधीश) .............................परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता दारूची दुकाने सुरू केल्याने काय परिस्थिती निर्माण होऊ शकते याचा विचार सरकारने केला असेलच. एवढ्या दुकानांवर प्रचंड गर्दी होणार आहे हे लक्षात घेऊन अगोदर उपाययोजना करायला हवी होती. दारू मिळाली नाही म्हणून कुणी मरणार नव्हते. हे लक्षात घ्यायला हवे. सरकारच्या निर्णयाचा अतिरेक होताना दिसत आहे. त्याच्यातून कोरोना संसर्ग होण्याचा धोका वाढला आहे. गर्दीचे फोटो पाहिल्यानंतर ते लक्षात येते. दुसरे असे की, पोलिसांची संख्या, कोरोनाबाधित पोलिसांच्या संख्येत वाढ होत आहे. अशावेळी काय करणार ? अगोदरच अपुरे मनुष्यबळ त्यात असे संकट असताना परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. बंदोबस्ताचे जे प्रकार आहेत त्यात सरकारच्या या निर्णयामुळे आणखी एक भर पडली आहे. दारूची दुकाने उघडली हे चुकीचे झाले. - अरविंद पाटील (निवृत्त सहायक पोलिस आयुक्त )

टॅग्स :Puneपुणेliquor banदारूबंदीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPoliceपोलिसCourtन्यायालयState Governmentराज्य सरकारUddhav Thackerayउद्धव ठाकरे