शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
2
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
3
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
4
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
6
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
7
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
8
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
9
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
10
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
11
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
12
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
13
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
14
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
15
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
16
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
17
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
18
घरांच्या विक्रीला ‘ब्रेक’; पुणे, मुंबईत मोठी घसरण; नव्या विमानतळामुळे...
19
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
20
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus अत्यावश्यक सेवेसाठी लोकल सुरु करावी; उद्धव ठाकरेंची पंतप्रधानांकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2020 19:45 IST

CoronaVirus पंतप्रधानांनी आज देशातील मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. यावेळी विविध राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांचे मुद्दे मांडले. लॉकडाऊनच्या बाबत पंतप्रधानांनी निश्चित व ठोस अशी दिशा दाखवावी, असे आवाहनही ठाकरे यांनी केले.

मुंबई : लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल करतांना आपण ग्रीन झोनमध्ये उद्योग-व्यवसाय सुरु होतील असे पाहिले आहे. मुंबईतही फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी उपनगरीय सेवा सुरु करावी अशी विनंती मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली. तसेच मजुरांची ने-आण करताना कोरोनाचा प्रसार होणार नाही त्याची त्या राज्यांनी काळजी घ्यावी, असेही ठाकरे यांनी सांगितले. 

पंतप्रधानांनी आज देशातील मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. यावेळी विविध राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांचे मुद्दे मांडले. लॉकडाऊनच्या बाबत पंतप्रधानांनी निश्चित व ठोस अशी दिशा दाखवावी, असे आवाहनही ठाकरे यांनी केले. गेल्या दोन महिन्यांपासून सर्व जण अडकले आहेत. महाराष्ट्राने साडे पाच लाख मजुरांच्या निवारा व नाश्ता, भोजनाची व्यवस्था चोखपणे ठेवली तसेच इतर राज्यांशी समन्वय ठेऊन मजुरांना पाठवणे सुरु केले आहे, असेही ठाकरे म्हणाले. 

तसेच लॉकडाऊनबाबत बोलताना त्यांनी जून, जुलैमध्ये कोरोनाचा उच्चांक होऊ शकतो. वुहानमध्ये परत कोरोनाने डोके वर काढलेय अशा बातम्या वाचल्या आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने सुद्धा इशारा दिला आहे. यामुळे लॉकडाऊनबाबत काळजीपूर्वक कार्यवाही व्हावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. 

 

मुंबईमध्ये लोकलसेवा बंद आहे. ती फक्त अत्यावश्यक सेवेतील व्यक्तींसाठीच सुरु करावी. तसेच ओळखपत्र पाहूनच प्रवासाची परवानगी देण्याची मागणी ठाकरे यांनी केली. राज्यात कर्जमाफीची योजना सुरु होती. मात्र, विदर्भात निवडणुका असल्याने तिथे याचा फायदा मिळालेला नाही. खरीप हंगाम सुरु होत आहे. यामुळे या शेतकऱ्यांना कर्ज मिळण्याच्या सूचना आरबीआयला देण्यात याव्यात, अशीही मागणी ठाकरे यांनी केली. तसेच केंद्राकडे देय असलेला जीएसटीचा परतावा लगेचच देण्यात यावा अशी मागणीही ठाकरे यांनी केली. 

आवश्यकता भासल्यास मनुष्यबळ द्यावे  केंद्रीय पथकांनी मुंबई-पुणे येथे भेटी दिल्या असून उपयुक्त सूचना केल्या आहेत. आमचे पूर्ण सहकार्य असेल असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस अहोरात्र काम करीत आहेत. विशेषत: पोलिसाना  मधूनमधून विश्रांती देण्याची गरज आहे , त्यांच्याकडे कायदा व सुव्यवस्थेचे काम आहे, ते आजारी पडून चालणार नाही. त्यामुळे  आवश्यकता भासेल तसे केंद्र सरकारने त्यांचे मनुष्यबळ उपलब्ध करून दिल्यास पोलिसांवरचा ताण कमी होईल.  त्याचप्रमाणे केंद्रीय संस्था, पोर्ट ट्रस्ट, लष्कराची रुग्णालये व आयसीयू बेड्स सुविधाही मिळाल्यास पुढे कोरोनाशी लढतांना त्याचा उपयोग होईल.

 

महत्वाच्या बातम्या...

CoronaVirus कोरोनापासून गावांना लांब ठेवा; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली भीती

पाकिस्तानची जिरली! भारतातून औषधांआडून 'या' वस्तूची तस्करी

Vidhan Parishad Election उद्धव ठाकरेंची संपत्ती किती? आज पहिल्यांदाच झाला खुलासा

धक्कादायक! इराणने स्वत:च्याच युद्धनौकेवर मिसाईल डागले; 19 नौसैनिकांचा मृत्यू

अजब! चंद्राचा तुकडा विक्रीला; किंमत करोडोंच्या घरात

CoronaVirus नियम बदलले, १५५९ रुग्ण बरे झाले : आरोग्य मंत्रालय

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेNarendra Modiनरेंद्र मोदीChief Ministerमुख्यमंत्रीcorona virusकोरोना वायरस बातम्या