पाकिस्तानची जिरली! भारतातून औषधांआडून 'या' वस्तूची तस्करी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2020 06:18 PM2020-05-11T18:18:39+5:302020-05-11T18:36:14+5:30

भारत सरकारने काश्मीर आणि लडाखला वेगळे करत काश्मीरचे कलम ३७०  विशेष दर्जा काढून घेतला होता. यामुळे पाकिस्तान संतापला होता. या रागातून त्याने भारतासोबतचे व्यापारी संबंध तोडताना ट्रेन आणि बस सेवाही बंद केली होती.

Pakistan Smuggling of drugs, mustered seed oil despite trade ban with India hrb | पाकिस्तानची जिरली! भारतातून औषधांआडून 'या' वस्तूची तस्करी

पाकिस्तानची जिरली! भारतातून औषधांआडून 'या' वस्तूची तस्करी

Next

इस्लामाबाद : जम्मू काश्मीर आणि लडाखला वेगळे करत काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतल्यावरून पाकिस्तानने भारतासोबत व्यापार बंद केला होता. मात्र, कोरोना व्हायरसने पाकिस्तानचे कंबरडे मोडले असून पुन्हा भारतासमोर झुकायला भाग पाडले आहे. पाकिस्तानला द्विपक्षीय करार मोडल्याचा फार मोठा फटका बसू लागला असून आता गरजेच्या औषधांच्या आडून खाण्याच्या वस्तू मागवू लागला आहे. 


भारत सरकारने काश्मीर आणि लडाखला वेगळे करत काश्मीरचे कलम ३७०  विशेष दर्जा काढून घेतला होता. यामुळे पाकिस्तान संतापला होता. या रागातून त्याने भारतासोबतचे व्यापारी संबंध तोडताना ट्रेन आणि बस सेवाही बंद केली होती. मात्र, असे करणे पाकिस्तानला अडचणीचे ठरू लागले आहे. 


पाकिस्तानच्या यंग फार्मासिस्ट असोसिएशनने पंतप्रधान इम्रान खान यांचे सहाय्यक शहजाद अकबर यांना पत्र लिहिले आहे. भारतासोबत व्यापार संपुष्टात आणल्यापासून भारतातून ४५० हून अधिक औषधे मागविण्यात येतात. सरकारला कॅन्सरच्या औषधाचा तुटवडा असल्याचे सांगितले होते. मात्र सरकारने जारी केलेल्या सूचीमध्ये औषधांसह मोहरीचे तेलही मागविण्यास मंजुरी देण्यात आली असल्याची तक्रार करण्यात आली आहे. 


हे पत्र व्हायरल होताच पाकिस्तानचा विरोधी पक्ष पीएमएल-एन ने इम्रान सरकारवर औषध घोटाळ्यांचा आरोप केला आहे. जर आमच्या सरकारकडून असे काही झाले असते तर आम्हाला लगेचच देशद्रोही असल्याचा ठपका लावला गेला असता. तसेच न्यायालयातही खेचले गेले असते. आता भारतातून आयात केलेल्या अब्जावधीच्या औषधांची चौकशी केली जावी. व्यापारी बंदी असतानाही भारताकडून औषधे आयात केली जात असल्याचे उघड झाले आहे. यामागे कोण आहे याचाही शोध घ्यावा अशी मागणी केली आहे.

महत्वाच्या बातम्या...

Vidhan Parishad Election उद्धव ठाकरेंची संपत्ती किती? आज पहिल्यांदाच झाला खुलासा

धक्कादायक! इराणने स्वत:च्याच युद्धनौकेवर मिसाईल डागले; 19 नौसैनिकांचा मृत्यू

अजब! चंद्राचा तुकडा विक्रीला; किंमत करोडोंच्या घरात

CoronaVirus नियम बदलले, १५५९ रुग्ण बरे झाले : आरोग्य मंत्रालय

Web Title: Pakistan Smuggling of drugs, mustered seed oil despite trade ban with India hrb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.