इच्छुकांकडून भेटीगाठीसोबतच ऑनलाईन प्रचाराचाही धुराळा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 02:10 PM2019-09-30T14:10:42+5:302019-09-30T14:25:01+5:30

मुंबई - विधानसभा निवडणुकीत उमेदवारीसाठी इच्छुक गेल्या कित्येक दिवसांपासून कामाला लागले आहेत. काँग्रेसेची पहिली यादी सोडली तर अजूनही महत्वाच्या ...

Start campaigning online by interested candidates | इच्छुकांकडून भेटीगाठीसोबतच ऑनलाईन प्रचाराचाही धुराळा

इच्छुकांकडून भेटीगाठीसोबतच ऑनलाईन प्रचाराचाही धुराळा

Next

मुंबई - विधानसभा निवडणुकीत उमेदवारीसाठी इच्छुक गेल्या कित्येक दिवसांपासून कामाला लागले आहेत. काँग्रेसेची पहिली यादी सोडली तर अजूनही महत्वाच्या पक्षांनी उमेदवारी जाहीर केली नाहीत. मात्र असे असले तरीही इच्छुकांनी आपल्या मतदारसंघात भेटीगाठी सुरु केल्या आहेत. मात्र त्याचबरोबर भावी आमदारांनी ऑनलाईन प्रचाराचाही धुराळा उडवत मतदारसंघातील आपल्या विरोधकांना घेरण्याचा प्रयत्न करत असल्याचे सुद्धा पाहायला मिळत आहे.

२०१४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सोशल मिडियाचे वर्चस्व पाहायला मिळाले होते.या निवडणुकीत राजकीय पक्षांकडून  अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर प्रभावीरीत्या केला गेल्याचे दिसून आले. तर गेल्यावेळी भाजपला मिळालेल्या यशात सुद्धा याच सोशल मिडियाचा सिहांचा वाटा होता. त्यामुळे यावेळी सर्वच मतदारसंघात इच्छुकांमध्ये सोशल मिडियाचे प्रचार युद्ध सुरु झाले असल्याचे पाहायला मिळत आहे.

विधानसभा निवडणुकीला यावेळी प्रचाराला कमी वेळ मिळणार असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे इच्छुकांनी आत्तापासूनच प्रचाराला सुरवात केली आहे. मात्र त्याचप्रमाणे इच्छुकांचा सोशल मिडियाच्या माध्यमातून सुद्धा जोरदार प्रचार सुरु असल्याचे मिळत आहे. ई-मेल, ट्विटर, फेसबुक, व्हाट्सएप, एसएमएस, यू-टय़ूबचे शस्त्र घेऊन भावी आमदार निवडणुकीच्या रणांगणात उतरले असल्याचे दिसत आहे.

कधीकाळी निवडणुकांमध्ये प्रचारासाठी बैलगाडय़ा, ट्रक, रिक्षा आणि मोठमोठे भोंगे घेऊन घोषणा देत प्रचार करणारे कार्यकर्ते आता मोबाईल व लॅपटॉपवरून सोशल प्रचार करतांना पाहायला मिळत आहे. तर अनेकांनी प्रचारासाठी सोशल वॉररूम सुद्धा सुरु केली आहेत. त्यामुळे यावेळी निवडणुकीत सोशल मिडियामधील होणार प्रचार उमेदवाराला विजय करण्यात मोठी भूमिका पार पाडणार आहे, हे निश्चित.

 

 

 

 

Web Title: Start campaigning online by interested candidates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.