शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

एसटीचे तिकीट आरक्षणही मोबाईल अॅपवर

By admin | Updated: July 19, 2016 19:53 IST

खासगी प्रवासी वाहतूकीला टक्कर देण्यासाठी कात टाकत असलेल्या राज्य मार्ग परिवाहन महामंडळ (एसटी) माहिती आणि तंत्रज्ञानाची कास धरली असली असून आता सर्वसामान्यांच्या

ऑनलाइन लोकमत

पुणे, दि.19 -  खासगी प्रवासी वाहतूकीला टक्कर देण्यासाठी कात टाकत असलेल्या राज्य मार्ग परिवाहन महामंडळ (एसटी) माहिती आणि तंत्रज्ञानाची कास धरली असली असून आता सर्वसामान्यांच्या प्रवासाची जीवनवाहीनी असलेले एसटीचे तिकिट बुकिंग आता मोबाईल अॅपवरही उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यासाठी स्वतंत्र मोबाईल अॅपची निर्मिती करण्यात आली असून या अॅपद्वारे प्रवाशांना आॅनलाईन पेमेंटही करता येणार आहे. MSRTC mobie reservation app या नावाने हे मोबाईल अॅप्लीकेशन असणार आहे. प्रवाशांच्या सोईसाठी आणि एका क्लिकवर तिकिटांचे आरक्षण करता यावे यासाठी एसटी महामंडळाने मोबाईल अ‍ॅपची निमीर्ती केली आहे.महामंडळाकडून १७ जुन पासून सर्वांसाठी हे नवीन अॅप्लीकेशन सुरू करण्यात आले आहे. ते मोबाईल मध्ये डाऊललोड केल्यानंतर प्रवाशाने नोंदणी करुन लॉगिन करणे गरेजेचे आहे. प्रवाशांला कोठे जायचे आहे, कोणत्या गाडीने जायचे आहे, कोणत्या ठिकाणाहून गाडीमध्ये बसायचे आहे तसेच कोणत्या ठिकाणावर उतरायचे आहे, हे सर्व पर्याय या अ‍ॅपवर उपलब्ध होणारत आहेत. सोयीचा आसन क्रमांक, बस सेवेचा प्रवार, बस पेष्ठरीची वेळही प्रवाशांना त्यांच्या सोयीनुसार निवडता येणार आहे. दरम्यान, आॅनलाई पेमेन्टची सुविधा हे आॅपचे वैशिष्टे आहे. तिकिटाच्या आरक्षणासाठी नेट बँकींग , क्रडीट, डेबिट कार्डद्वारे पेमेन्ट करण्याची सुविधा या अ‍ॅपवर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. हे अॅप्लीकेशन सर्व प्रकारच्या अँन्ड्रॉईड मोबाईलवर वापरता येणार आहे. खासगी प्रवासी वाहनांच्या बुकिंगसाठी गेल्या अनेक वर्षापासून मोबाईल अँप्लीकेशन उपलब्ध आहेत. त्यामुळे प्रवाशांना या सेवेकडे अधिक कल होता. त्यातच खासगी प्रवासी बसही अत्याधुनिक स्वरूपाच्या असल्याने एसटीकडे प्रवाशांचे दूर्लक्ष होत असल्याचे चित्र होते.मात्र, आता खासगी वाहतूकीला शह देण्यासाठी मोठया शहरांमध्ये अत्याधुनिक शिवनेरी बस, इंटरनेटद्वारे तिकिट बुकिंग आणि आता मोबाईल अँप्स द्वारे बुकिंगची सुविधा उपलब्ध करून देऊन एसटीने कात टाकल असल्याची प्रचिती पुन्हा एकदा दिली आहे.