ST Employees Vs Sharad Pawar: एसटी कर्मचारी शरद पवारांच्या घरावर का धडकले? प्रवीण दरेकरांनी कारण सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2022 04:33 PM2022-04-08T16:33:23+5:302022-04-08T16:33:53+5:30

Praveen Darekar on ST Workers Sharad Pawar issue: गेल्या पाच महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा चाललेला संप आता वेगळ्या वळणावर पोहोचला आहे. आज एसटी कर्मचाऱ्यांनी थेट शरद पवारांच्या घरावर चाल केली.

ST Employees Vs Sharad Pawar: Why did ST Employees came at Sharad Pawar's house? Praveen Darekar explained the reason | ST Employees Vs Sharad Pawar: एसटी कर्मचारी शरद पवारांच्या घरावर का धडकले? प्रवीण दरेकरांनी कारण सांगितले

ST Employees Vs Sharad Pawar: एसटी कर्मचारी शरद पवारांच्या घरावर का धडकले? प्रवीण दरेकरांनी कारण सांगितले

googlenewsNext

गेल्या पाच महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा चाललेला संप आता वेगळ्या वळणावर पोहोचला आहे. आज एसटी कर्मचाऱ्यांनी थेट शरद पवारांच्या घरावर चाल केली. चपला आणि दगडफेक करत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. यावर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी हे आंदोलक शरद पवारांच्या घरावर का धडकले याचे कारण सांगितले आहे. 

एसटी कर्मचाऱ्यांच्या १२० आत्महत्यानंतर सरकारने त्यांच्याकडे लश्र देण्याची गरज होती. परब, अजित पवार यांनी कामावर हजर व्हा, नाहीतर आम्ही तुम्हाला बघून घेऊ, अशी भाषा केली. एवढे मृत्यू होत असताना कारवाईचा बडगा उगारू अश धमकी देणे चुकीचे होते. सहानुभुतीने पाहिले गेले पाहिजे होते. एसटी कर्मचाऱ्यांसमोर पर्याय उरला नाही. सरकारचे सर्वेसर्वा असलेल्यांच्याच घरी आता धडक मारावी यातून ते पवारांच्या घरी धडकल्याचे दरेकर म्हणाले.  

१२० महिला विधवा झाल्या. त्यांचे घर, मुलांचे शिक्षण कसे चालेल. याचा सहानुभूतीने विचार करायला हवा होता. अशा परिस्थितीत पण तुम्ही कठोर कारवाई करण्याची भाषा करता. सरकारला भान राहिलेले नाही. शांत राहणार असाल तर बोलतो, असे सुप्रिया सुळे म्हणतात. अहो त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त झालेय. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना बोलविले जातेय. काय संघर्ष करायचा आहे का. ही वृत्ती सरकारला महागात पडल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा दरेकर यांनी दिला आहे. 

न्यायालयाने निर्णय दिल्यावर सरकारच्या वतीने चर्चेचा मार्ग काढला असता तर विषय सुटला असता. विधानसभेत १८ पैकी १६ मागण्या मान्य केल्या होत्या ना, मग आता न्यायालयाला पुढे का केले जातेय, असा सवालही त्यांनी केला. 

Web Title: ST Employees Vs Sharad Pawar: Why did ST Employees came at Sharad Pawar's house? Praveen Darekar explained the reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.