आंगणेवाडी यात्रेसाठी रेल्वेच्या विशेष गाड्या; उद्यापासून सुरू हाेणार आरक्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2024 07:57 IST2024-02-25T07:56:54+5:302024-02-25T07:57:10+5:30

भाविकांची  संभाव्य गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वेने विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. २६ फेब्रुवारीपासून गाड्यांचे आरक्षण सुरू होणार आहे.

Special Trains of Railways for Anganwadi Yatra; Reservation will start from 26 february | आंगणेवाडी यात्रेसाठी रेल्वेच्या विशेष गाड्या; उद्यापासून सुरू हाेणार आरक्षण

आंगणेवाडी यात्रेसाठी रेल्वेच्या विशेष गाड्या; उद्यापासून सुरू हाेणार आरक्षण

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : कोकणातील प्रतिपंढरपूर म्हणून ओळख असलेली आंगणेवाडी यात्रा २ मार्चला होणार आहे. दीड दिवसाच्या या यात्राेत्सवात लाखो  भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात. भाविकांची  संभाव्य गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वेने विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. २६ फेब्रुवारीपासून गाड्यांचे आरक्षण सुरू होणार आहे.

यात्रेसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यांतून भाविक येतात, ही बाब लक्षात घेऊन मध्य रेल्वेच्या समन्वयाने कोकण रेल्वेने १ ते ३ मार्चला दोन्ही मार्गांवर विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस-करमाळी ही विशेष गाडी शुक्रवार, १ मार्चला लोकमान्य टिळक टर्मिनसवरून रात्री १०:१५ वाजता सुटणार आहे. ही गाडी स. १० वाजता करमाळीला पोहोचेल. 

करमाळी-लोकमान्य टिळक टर्मिनस ही गाडी ३ मार्चला करमाळी स्थानकावरून दुपारी ३:२० वा. सुटेल. दुसऱ्या दिवशी पहाटे ३:४५ वा. ही गाडी लोकमान्य टिळक स्थानकावर पोहोचेल. ही गाडी ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी, थिविम स्थानकांवर थांबेल.

Web Title: Special Trains of Railways for Anganwadi Yatra; Reservation will start from 26 february