शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
2
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
3
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
4
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
5
बाजारात 'मंदीचा' सोमवार! सेन्सेक्स-निफ्टी धडाधड कोसळले; 'या' ५ कारणांमुळे घसरण
6
दीड लाख पगार अन् राहण्या-खाण्याची सोय! रशियात भारतीयांसाठी मोठी संधी, असे मिळवा वर्क परमिट
7
Prakash Mahajan: "भाजपच्या घराला दार नाही, फक्त पहारेकरी" प्रकाश महाजन यांचा घणाघात!
8
"आमिर खानचे पैसे माझे नाहीत..."; बॉलिवूडपासून दूर असलेला इमरान खान सापडलेला आर्थिक संकटात, म्हणाला...
9
आता शिक्षक करणार भटक्या कुत्र्यांची मोजणी, ‘या’ राज्यातील सरकारने दिले आदेश
10
मराठी अभिनेत्री लढवणार मुंबई महापालिकेची निवडणूक, निशा परुळेकरला भाजपाकडून मिळालं तिकीट
11
आता केवळ २ दिवस शिल्लक, PAN Aadhaar लवकर लिंक करा; अन्यथा होईल मोठी डोकेदुखी
12
४ ओव्हर्स, ७ रन्स आणि ८ विकेट्स! या गोलंदाजाने T20I मध्ये सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
13
Aadhaar Card : तुमचे 'आधार कार्ड' लॉक करा, नाही तर बँक खाते होईल रिकामे; जाणून घ्या प्रक्रिया
14
एकट्याच्या जीवावर सिनेमा करुन दाखव..., 'दृश्यम ३'च्या दिग्दर्शकाचं अक्षय खन्नाला खुलं आव्हान
15
सोन्या-चांदीच्या किंमतीबाबत बाबा वेंगानी काय म्हटलं; दरांबाबत काय केली भविष्यवाणी? जाणून घ्या
16
पुण्यात भाजपची अळीमिळी गुपचिळी! 'उमेदवारी मिळाली हो...!' उमेदवारांचे समर्थकांना सकाळीच गेले फोन, एबी फॉर्म उद्या मिळणार?
17
BMC Election 2026 Shiv Sena UBT List: उद्धवसेनेकडून मुंबई महापालिकेसाठी ५५ जणांना उमेदवारी, कोणाला मिळाले एबी फॉर्म?
18
सावधान! तुमच्या नावावर भलतेच कोणी सिम वापरत नाहीये ना? 'या' पोर्टलवर घरबसल्या करा तपासणी
19
मकर राशीसाठी नवीन वर्ष 2026: जुन्या आव्हानांचा होणार अंत; प्रगतीसाठी 'हे' सूत्र वापरा आणि यश मिळवा!
20
२०२५ची शेवटची पुत्रदा एकादशी: कसे कराल व्रतपूजन?; ‘या’ गोष्टी आवर्जून करा, पुण्य-लाभ मिळेल!
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील शाळांमध्ये एकाचवेळी राबविणार विशेष पटपडताळणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 14:31 IST

जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली पथक

रत्नागिरी : राज्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या व शिक्षकांची संचमान्यता याची एकाचवेळी तपासणी करण्यासाठी शासनातर्फे विशेष पट पडताळणी मोहीम राबविण्यात येणार आहे. यासाठी शिक्षण विभाग, महसूल आणि शासनाच्या अन्य विभागातील अधिकारी यांचे पथक तयार करण्यात येणार आहे. हे पथक सर्व शाळांना एकाच वेळी अचानक भेट देणार आहे. मात्र, त्याबाबतची तारीख निश्चित करण्यात आलेली नाही.शाळांच्या बोगस हजेरीवर नियंत्रण आणण्यासाठी शासनातर्फे विशेष पट पडताळणी मोहीम राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्याच्या अमलबजावणीबाबतचे पत्र जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग आणि जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात आले आहे. त्यानुसार तपासणी पथक हजेरी पत्रकावर नोंदवलेले विद्यार्थी आणि प्रत्यक्षात वर्गात उपस्थित असलेले विद्यार्थी यांची पडताळणी करण्यात येणार आहे. विद्यार्थी गैरहजर असतानाही त्यांची हजेरी लावणाऱ्या संबंधित शिक्षक आणि मुख्याध्यापकांवर कारवाई करण्यात येणार आहे. विशेष पट पडताळणीपूर्वी प्रत्येक मुख्याध्यापकाने हजेरीपत्रकात भरलेल्या विद्यार्थ्यांच्या माहितीची पडताळणी केंद्रप्रमुख आणि नंतर गटशिक्षणाधिकारी यांनी करायची आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली पथकप्रत्येक जिल्ह्यातील शाळांमधील पटसंख्या एकाचवेळी तपासण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली पथके तयार करण्यात येणार आहेत. संच मान्यतेनुसार शिक्षकांच्या प्रमाणात त्या शाळांमध्ये पुरेसे विद्यार्थी आहेत का याची पडताळणी केली जाणार आहे. जानेवारीत संचमान्यता आणि समायोजन होणार असून, विशेष पट पडताळणीमुळे हे काम सुलभ होणार आहे.

रिक्त पदांचे होणार समायोजनविशेष पट पडताळणीनंतर शाळांमधील विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष संख्या, रिक्त आणि अतिरिक्त शिक्षकांची संख्या कळणार आहे. त्यानंतर पटसंख्येअभावी अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे रिक्त पदांवर समायोजन करण्यात येणार आहे.

कमी पटसंख्येच्या शाळांवर संकट१५ मार्च २०२५ च्या शासन निर्णयानुसार वीसपेक्षा कमी पटसंख्येच्या शाळा तथा वर्ग (इयत्ता नववी व दहावीचे) बंद होणार आहेत. पटसंख्येची ही अट शिथिल करावी, असा प्रस्ताव संचालक कार्यालयातून शासनाकडे पाठवला गेला आहे; मात्र त्यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : Special Enrollment Verification Drive in Maharashtra Schools Soon

Web Summary : Maharashtra schools will undergo a special enrollment verification drive by government teams. This aims to curb bogus attendance, adjust teacher postings based on actual student numbers, and address low-enrollment schools facing closure.