शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
2
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
3
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
4
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
5
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
6
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
7
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
8
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
9
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
10
म्हशीला रेबीज, ३० जणांना टोचावे लागले इंजेक्शन! प्रकरण ऐकाल तर हादरून जाल
11
उन्हाळ्यात किचनमध्ये काम करताना नुसत्या घामाच्या धारा; 'असं' ठेवा स्वत:ला थंड थंड कूल कूल
12
अर्जुन तेंडुलकर आणि वैभव सूर्यवंशी यांच्यातील फिल्डबाहेरची खास गोष्ट; कमाईच्या बाबतीत कोण भारी?
13
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
14
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
15
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
16
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
17
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
18
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
19
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
Daily Top 2Weekly Top 5

दक्षिण, संपर्कक्रांती एक्स्प्रेस रोखली

By admin | Updated: August 25, 2014 01:09 IST

मानकापूर रेल्वेगेट बंद करू नये या मागणीसाठी या परिसरातील नागरिकांनी आज रविवारी सायंकाळी ५.२० वाजता आंदोलन करून संपर्कक्रांती आणि दक्षिण एक्स्प्रेस सुमारे एक तास रोखून धरली.

मानकापूर गेट सुरू ठेवा : १० जणांविरुद्ध गुन्हा दाखलनागपूर : मानकापूर रेल्वेगेट बंद करू नये या मागणीसाठी या परिसरातील नागरिकांनी आज रविवारी सायंकाळी ५.२० वाजता आंदोलन करून संपर्कक्रांती आणि दक्षिण एक्स्प्रेस सुमारे एक तास रोखून धरली. दरम्यान रेल्वे सुरक्षा दलाने आंदोलनकर्त्या १० नागरिकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.मानकापूर येथे मध्य रेल्वेच्या नागपूर विभागांतर्गत रेल्वे किलोमीटर क्रमांक २९४ येथे उड्डाणपूल उभारण्यात आला आहे. उड्डाणपूल तयार झाल्यानंतर रेल्वे पूर्वीचे लेव्हल क्रॉसिंग गेट बंद करते. उड्डाणपूल झाल्यानंतर रेल्वेने मानकापूरचे गेटही बंद केले. परंतु हे गेट बंद केल्यामुळे या परिसरातील नागरिक चांगलेच संतापले. जवळपास ५०० नागरिक या गेटजवळ पोहोचले. त्यांनी १२६४९ यशवंतपूर-हजरत निजामुद्दीन संपर्कक्रांती एक्स्प्रेस आणि १२७२२ हजरत निजामुद्दीन-विशाखापट्टनम दक्षिण एक्स्प्रेस या दोन्ही गाड्या मानकापूर गेट क्रमांक २९४ जवळ सायंकाळी ५.२० वाजता रोखून धरीत हे रेल्वेगेट बंद न करण्याची मागणी केली. दोन्ही गाड्या रोखून धरल्याची बाब रेल्वे सुरक्षा दल आणि लोहमार्ग पोलिसांना कळताच ते घटनास्थळी पोहोचले. त्यांनी जमावाला रेल्वेगेटजवळून बाजूला करण्यास सुरुवात केली. तब्बल एक तासानंतर जमावाला पांगवण्यात त्यांना यश आले. त्यानंतर या दोन्ही गाड्या आपल्या पुढील प्रवासाला रवाना झाल्या. (प्रतिनिधी)