शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

अजित पवारांचं मंत्रिमंडळ विस्ताराआधी मोठं विधान; म्हणाले, "जागा मर्यादित..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2024 15:48 IST

महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्ताराआधीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्त्वाचे विधान केलं आहे.

Maharashtra Cabinet Expension : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाळाचा विस्तार आज होणार आहे. नागपूरच्या राजभवनमध्ये दुपारी ४ वाजता हा शपथविधी सोहळा होणार आहे. यामध्ये ३० ते ३२ मंत्र्यांचा समावेश असण्याची शक्यता आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य मंत्र्यांच्या याद्या देखील समोर आल्या आहेत. तिन्ही पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडून आमदारांना मंत्रीपदाच्या शपथविधीला उपस्थित राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रीपदाबाबत महत्त्वाचे विधान केलं आहे. जास्तीत जास्त आमदारांना मंत्रिमंडळात काम करता यावं यासाठी महायुतीच्या तिन्ही नेत्यांनी योजना आखल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

नागपुरात मंत्रिमंडळ विस्ताराआधी राष्ट्रवादीचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, दिलीप वळसे पाटील आदी नेते उपस्थित होते. यावेळी बोलताना अजित पवार यांनी काही मंत्र्‍यांचा कार्यकाळ हा अडीच वर्षांचा असणार असल्याचे स्पष्ट केलं आहे. तिघांमध्येही याबाबत एकवाक्यता झाली असल्याचेही अजित पवार यांनी म्हटलं आहे. "सगळ्यांनाच वाटतं की आपल्याला मंत्रिमंडळामध्ये संधी मिळावी. जागा मर्यादित असतात, सगळेच ताकदीचे असतात. पण ज्यावेळी आपण सरकारमध्ये गेलो त्यावेळी काहींना दीड वर्षाची कारकिर्द मिळाली आहे. या पाच वर्षाच्या कारकि‍र्दीमध्ये साधारणपणे आम्ही लोकांनी असं ठरवलं आहे की, काहींना अडीच वर्षांसाठी संधी देण्यात येणार आहे. म्हणजे अनेक मंत्री आणि राज्यमंत्री त्यामध्ये सामावून घेतले जातील. अनेक जिल्ह्यांना प्रतिनिधित्व मिळेल. तिघांमध्येही याबाबत एकवाक्यता झालेली आहे याची कृपया नोंद घ्यावी," असं अजित पवार यांनी म्हटलं.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य मंत्र्यांची यादी

आदिती तटकरे बाबासाहेब पाटील दत्तमामा भरणे हसन मुश्रीफ नरहरी झिरवाळमकरंद पाटीलइंद्रनील नाईकधनंजय मुंडेमाणिकराव कोकाटे

दरम्यान, अजित पवार यांनी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना मंत्रिपदापासून दूर ठेवल्याचे म्हटलं जात आहे. ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धर्मराव बाबा आत्राम या जुन्या मंत्र्यांना संधी मिळणार नसल्याची चर्चा सुरु झाली आहे. दिलीप वळसे पाटील, धर्मराव बाबा आत्राम हे अजित पवार यांच्यासोबत नागपुरातील कार्यक्रमात उपस्थित होते. मात्र छगन भुजबळांची या कार्यक्रमाला उपस्थिती नसल्याने ते नाराज आहेत का असा सवाल विचारला जात आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसMahayutiमहायुतीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस