गॅसटंचाईवर उतारा; पेट्रोल पंपांवर मिळणार केरोसिन
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 07:10 IST2026-03-17T07:08:59+5:302026-03-17T07:10:12+5:30
यापूर्वी केरोसिन बंद झाल्यामुळे डिलर्सची साखळी खंडित झाली. त्यामुळे सुरुवातीला पेट्रोल पंपांवर केरोसिन देण्याचा निर्णय घेण्यात आला.

गॅसटंचाईवर उतारा; पेट्रोल पंपांवर मिळणार केरोसिन
मुंबई : राज्यात एलपीजी गॅसच्या टंचाईमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारकडून बाजारात मोठ्या प्रमाणावर केरोसिन उपलब्ध करून देण्याची योजना आखण्यात आली आहे. त्यानुसार लवकरच पेट्रोल पंपांवर केरोसिन उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सोमवारी दिली. तसेच एलपीजी गॅस पुरवठ्याबाबत नागरिकांनी काळजी करू नये असे आवाहनही त्यांनी केले.
यापूर्वी केरोसिन बंद झाल्यामुळे डिलर्सची साखळी खंडित झाली. त्यामुळे सुरुवातीला पेट्रोल पंपांवर केरोसिन देण्याचा निर्णय घेण्यात आला.
युद्धामुळे खाद्य तेलाच्या किमतीत मोठी वाढ -
शेंगदाणा तेल १८८.२१ रुपयांवरून १९४.३२, राईचे तेल २००.६७ वरुन २०४.२२ रुपये , वनस्पती तेल १६०.४७ वरून १६०.६३ रुपये, सोया तेल १५३.६३ वरून १५९.३२ रुपये, सनफ्लॉवर तेल १७२.१६ वरुन १७८.०५ रुपये, पाम तेल १४५.६० वरून १४८.६० रुपये याप्रमाणे खाद्यतेलाच्या किंमती वाढल्या आहेत.