शहरं
Join us  
Trending Stories
1
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
3
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
4
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
5
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
6
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
7
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
8
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
9
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
10
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
11
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
12
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
13
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
14
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
15
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
16
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
17
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
18
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
19
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
20
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
Daily Top 2Weekly Top 5

मांसाहारबंदी विरोधात एकवटले

By admin | Updated: April 8, 2015 01:46 IST

राज्यघटनेने देशातील जनतेला भाषा, वेषभूषा, भोजन आणि भुवन हे मूलभूत अधिकार प्रदान केले असताना राज्यात गोवंशहत्या बंदीपाठोपाठ कोंबड्या

मुंबई : राज्यघटनेने देशातील जनतेला भाषा, वेषभूषा, भोजन आणि भुवन हे मूलभूत अधिकार प्रदान केले असताना राज्यात गोवंशहत्या बंदीपाठोपाठ कोंबड्या, बकरे, मासे खाण्यावरही टप्प्याटप्प्याने बंदी करण्याबाबत राज्याच्या अ‍ॅडव्होकेट जनरल यांनी मुंबई उच्च न्यायालयात केलेले विधान हे मूलभूत अधिकारांचा संकोच करणारे आहे, असे मत बहुतांश सदस्यांनी व्यक्त केल्याने विधान परिषदेत मांसाहारावर सर्वपक्षीय एकमत असल्याचे चित्र दिसले.शिवसेनेच्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी हा विषय उपस्थित केला. शिवसेना राज्यातील सत्तेत सहभागी असून, राज्यातील मांसाहार बंद करण्याची सरकारची भूमिका आहे का हे स्पष्ट झाले पाहिजे. याच विषयावर शेकापच्या जयंत पाटील यांनी सर्व कामकाज बाजूला ठेवून चर्चेचा प्रस्ताव दिला होता. पाटील म्हणाले की, सभागृह सुरू असताना धोरणात्मक निर्णय जाहीर करण्यापूर्वी सरकारने सभागृहाला विश्वासात घेणे गरजेचे असते. मात्र गोवंशहत्या बंदीच्या न्यायालयीन प्रकरणात राज्याच्या अ‍ॅडव्होकेट जनरलने असे परस्पर धोरण जाहीर करणे योग्य नाही. आपल्याला दररोज सकाळी भाकरीसोबत मांसाहार करावा लागतो. अ‍ॅडव्होकेट जनरल यांचे विधान ऐकल्यापासून काल रात्री आपल्याला झोप लागली नाही, असे पाटील म्हणाले. याच न्यायाने कांदा, लसूण सेवनावरही बंदी आणणार का, अशी विचारणाही त्यांनी केली.विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे म्हणाले की, सरकारने संपूर्ण शाकाहार हे धोरण स्वीकारले तर कुक्कुटपालक, कोळी, खाटीक समाज यांच्या रोजीरोटीची पर्यायी व्यवस्था सरकार करणार आहे का ते स्पष्ट झाले पाहिजे. काँग्रेसचे माणिकराव ठाकरे म्हणाले की, सभागृहातील ८५ टक्के सदस्य मांसाहार करतात. त्यामुळे मांसाहारावर बंदी आणण्यामुळे गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे. महाराष्ट्रातील जनतेने आता काय खावे हेही सरकार ठरवणार का, असा सवाल करून ठाकरे म्हणाले की, काही विशिष्ट लोक सरकारच्या पाठीशी उभे असल्याने त्यांना खूश करण्याकरिता सरकार हा निर्णय घेत आहे हे योग्य नाही. (विशेष प्रतिनिधी)