सोलापूर अन् उस्मानाबाद जिल्ह्यातील ४१ साखर कारखान्यांकडे ११८६ कोटींची साखर शिल्लक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 12:02 IST2019-06-28T12:00:51+5:302019-06-28T12:02:58+5:30
एफआरपीचे ६०९ कोटी देणे; आधारभूत ३१०० रुपये क्विंटल दराने साखर विक्रीला परवानगी

सोलापूर अन् उस्मानाबाद जिल्ह्यातील ४१ साखर कारखान्यांकडे ११८६ कोटींची साखर शिल्लक
सोलापूर: केंद्र शासनाने ठरविलेल्या ३१०० रुपये क्विंटल आधारभूत किमतीनुसार सोलापूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील ४१ साखर कारखान्यांकडे ११८५ कोटी ८४ लाख ४२ हजार ४०० रुपयांची साखर शिल्लक आहे. एफआरपीप्रमाणे ६०८ कोटी ६४ लाख रुपये इतकी रक्कम कारखाने शेतकºयांचे देणे आहे.
राज्यातील साखर कारखान्यांकडे एफआरपीनुसार शेतकºयांचे देणे असून स्वॉफ्ट लोन घेऊन एफआरपी देण्याची सवलत शासनाने दिली होती. एफआरपी न देणाºया काही कारखान्यांवर आरआरसीनुसार साखर जप्तीची कारवाई करण्यात आली. तरीही कारखान्यांनी शेतकºयांचे पैसे दिले नाहीत. त्यानंतर स्वॉफ्ट लोन उचलल्यानंतरही सोलापूर व उस्मानाबादच्या ३३ साखर कारखान्यांनी एफआरपी चुकती केली नसल्याने शासनाने शिल्लक साखर विक्री करून शेतकºयांचे पैसे देण्याची सवलत कारखान्यांना दिली आहे.
शासनाने दिलेल्या सवलतीनुसार कारखान्यांनी साखर विक्री सुरू केली आहे. १५ मे रोजीच्या सोलापूर साखर सहसंचालक कार्यालयाकडील आकडेवारीनुसार सोलापूर जिल्ह्यातील ३१ व उस्मानाबादच्या १० अशा ४१ कारखान्यांकडे ३८ लाख २५ हजार ३०४ क्विंटल साखर शिल्लक आहे. केंद्र शासनाने साखरेची आधारभूत किंमत प्रतिक्विंटल ३१०० रुपये ठरवली आहे. शिल्लक साखरेची केंद्र शासनाने ठरविलेल्या आधारभूत किमतीनुसार ११८५ कोटी ८४ लाख ४२ हजार ४०० रुपये इतकी किंमत होते. दोन्ही जिल्ह्यातील ३३ साखर कारखान्यांनी १५ जूनच्या अहवालानुसार एफआरपीप्रमाणे ६०८ कोटी ६४ लाख रुपये इतकी रक्कम शेतकºयांची दिली नाही. शासनाने दिलेल्या सवलतीप्रमाणे कारखाने शिल्लक साखर विक्री करून एफआरपीची रक्कम देत असल्याचे सांगण्यात आले.
उस्मानाबादचे कारखाने शिल्लकमध्ये
- उस्मानाबाद जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडे १६ लाख ५० हजार ८७९ क्विंटल साखर असून त्याची आधारभूत किंमत ५११ कोटी ७७ लाख २४ हजार ९०० रुपये होते तर एफआरपीप्रमाणे १२५ कोटी ४ लाख रुपये इतकी रक्कम शेतकºयांचे देणे आहे.आधारभूत किमतीने साखर विक्री झाली तरीही ५१२ कोटी येतात व १२५ कोटी देणे असल्याने उस्मानाबादचे कारखाने शिल्लकमध्ये आहेत.
- सोलापूर जिल्ह्यातील ३१ साखर कारखान्यांकडे २१ लाख ७४ हजार ४२५ क्विंटल साखर शिल्लक असून आधारभूत किमतीप्रमाणे त्याची किंमत ६७४ कोटी ७ लाख १७ हजार ५०० रुपये होते. २५ साखर कारखान्यांकडे एफआरपीनुसार ४८३ कोटी ६० लाख रुपये शेतकºयांचे देणे आहे.
साखर विक्री करून एफआरपीची रक्कम देण्याची शासनाने सवलत दिली आहे. त्यानुसार बºयाच कारखान्यांनी साखर विक्री सुरू केली आहे. त्यातून शेतकºयांचे पैसे दिले जातील. जूनअखेर विक्री झालेली साखर व दिलेल्या एफआरपीची आकडेवारी समोर येईल.
- अविनाश देशमुख
प्रादेशिक सहसंचालक सोलापूर (साखर)