Social Viral: बेस्ट संपामुळे उद्धव ठाकरेंचा ट्रेनने प्रवास 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2019 07:08 PM2019-01-14T19:08:33+5:302019-01-14T19:25:40+5:30

मुंबईतील सार्वजनिक रस्ते वाहतुकीचा कणा असलेल्या बेस्ट परिवहन सेवेतील कर्मचाऱ्यांचा संप सलग सातव्या दिवशीही सुरू आहे.

Social Viral : Uddhav Thackeray Travel by local train due to best strike | Social Viral: बेस्ट संपामुळे उद्धव ठाकरेंचा ट्रेनने प्रवास 

Social Viral: बेस्ट संपामुळे उद्धव ठाकरेंचा ट्रेनने प्रवास 

googlenewsNext
ठळक मुद्देमुंबईतील सार्वजनिक रस्ते वाहतुकीचा कणा असलेल्या बेस्ट परिवहन सेवेतील कर्मचाऱ्यांचा संप सलग सातव्या दिवशीही सुरू आहेआज बेस्ट बसचालक आणि वाहकांच्या संपामुळे त्रस्त असलेल्या उद्धव ठाकरे यांनी चक्क लोकलमधून प्रवास केल्याचा फोटो सोशल  मीडियावर व्हायरल झालामात्र हे उद्धव ठाकरे नसून त्यांच्यासारखी दिसणारी व्यक्ती आहे

मुंबई - मुंबईतील सार्वजनिक रस्ते वाहतुकीचा कणा असलेल्या बेस्ट परिवहन सेवेतील कर्मचाऱ्यांचा संप सलग सातव्या दिवशीही सुरू आहे. संपावर तोडगा सलग आठवडाभर सुरू असलेल्या या संपामुळे सर्वसामान्य मुंबईकर आणि चाकरमानी मेटाकुटीस आले आहेत.  मात्र या परिस्थितीतही मुंबईकरांकडून मिश्कील टिप्पण्या करण्यात येत आहेत. आजतर बेस्ट बसचालक आणि वाहकांच्या संपामुळे त्रस्त असलेल्या उद्धव ठाकरे यांनी चक्क लोकलमधून प्रवास केल्याचा फोटो सोशल  मीडियावर व्हायरल झाला आहे. 

हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, उद्धव ठाकरे गर्दीने भरलेल्या लोकलमधून प्रवास करत आहेत, असे दिसत आहे. मात्र हे उद्धव ठाकरे नसून त्यांच्यासारखी दिसणारी व्यक्ती आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोखाली मुंबईकरांकडून गमतीदार प्रतिक्रिया येत आहेत. मात्र उद्धव ठाकरेंसारखी दिसणारी ही व्यक्ती नेमकी कोण? हे समोर आलेले नाही. 

Web Title: Social Viral : Uddhav Thackeray Travel by local train due to best strike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.