... So this Maharashtra will never forgive you, MNS MLA's letter to the Chief Minister | ...तर हा महाराष्ट्र आपल्याला कदापि माफ करणार नाही, मनसे आमदाराचे मुख्यमंत्र्यांना पत्र

...तर हा महाराष्ट्र आपल्याला कदापि माफ करणार नाही, मनसे आमदाराचे मुख्यमंत्र्यांना पत्र

ठळक मुद्दे'अरबी समुद्रात शिवस्मारक उभं राहील तेव्हा राहील, पण शिवरायांची जी खरी स्मारकं आहेत ती आपण जपली नाहीत तर हा महाराष्ट्र आपल्याला माफ करणार नाही'

ठाणे : छत्रपतींच्या नावाने केवळ राजकारणच होणार असेल तर यासारखी दुर्दैवी गोष्ट नाही. अरबी समुद्रात शिवस्मारक उभं राहील तेव्हा राहील, पण शिवरायांची जी खरी स्मारकं आहेत ती आपण जपली नाहीत तर हा महाराष्ट्र आपल्याला माफ करणार नाही, अशा शब्दांत मनसेचे आमदार राजू पाटील यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेले व शिवकालीन इतिहासाचे जिवंत साक्षीदार असलेल्या गडकिल्ल्यांची झालेली दुरावस्था पाहून आमदार राजू पाटील मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. यात महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांच्या सध्याच्या अवस्थेची माहिती नावासह राजू पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना दिली आहे. 

प्रतापगडावर दरड कोसळून तटबंदीला धोका निर्माण झाला आहे. विशाळगड, पन्हाळगडावर पडझड झाली आहे. विजयदुर्गची तटबंदी ढासळली आहे. हे सगळं पाहिल्यावर छत्रपतींचे नाव घ्यायची खरंच आपली योग्यता आहे का? असा प्रश्न पडतो, असे राजू पाटील यांनी म्हटले आहे. 

याचबरोबर, पुरातत्व खाते केंद्राकडे आहे, त्यामुळे आपण काहीच करणार नाही अशी बोटचेपी भूमिका महाराष्ट्र सरकार घेणार असेल तर हा इतिहास नामशेष व्हायला वेळ लागणार नाही. तसेच, छत्रपतींच्या नावाने केवळ राजकारणच होणार असेल तर यासारखी दुर्दैवी गोष्ट नाही, असे म्हणत राजू पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे काही मागण्या पत्राद्वारे केल्या आहेत.

मनसे आमदार राजू पाटील यांनी केलेल्या मागण्या....

- महाराष्ट्रातील किल्ल्यांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करावे.
- दुर्गसंवर्धन खाते निर्माण करावे व भरीव निधीची तरतूद करून केंद्रीय पुरातत्व खात्याकडे पाठपुरावा करावा.
- प्रत्येक किल्ल्यावर संबंधित किल्ल्याचा इतिहास व माहिती मिळण्याची व्यवस्था करावी.
- शिवाजी महाराजांच्या हाताचे व पायाचे ठसे असलेल्या सिंधुदुर्ग या किल्ल्यावर शिवरायांचे स्मारक असावे.
- कल्याणचा दुर्गाडी किल्ला हा राज्य व केंद्रीय पुरातत्व विभागाच्या असंरक्षित स्मारकांच्या यादीत असल्याने, त्याठिकाणी राज्य व केंद्रीय पातळीवरनिधी उपलब्ध न होऊन संवर्धन होऊ शकत नाही. त्यामुळे राज्य शासनाने हा दुर्गाडी किल्ला संरक्षित करावा.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: ... So this Maharashtra will never forgive you, MNS MLA's letter to the Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.