"फडणवीसांच्या गृहखात्याविरोधातच घोषणा, शिंदेंची शिवसेना थेट सत्तेतून बाहेर का पडत नाही?", सतेज पाटलांनी डिवचले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 12:43 IST2026-03-23T12:41:18+5:302026-03-23T12:43:32+5:30

Satara ZP News: सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीत सत्ताधारी भाजपा आणि शिंदेसेना मंत्रीच आमने-सामने आले. या सगळ्या प्रकरणाचे पडसाद विधानसभा आणि विधान परिषदेत उमटले. 

"Slogans are against Fadnavis' Home Ministry, why doesn't Shinde's Shiv Sena directly exit power?", Satej Patil wondered | "फडणवीसांच्या गृहखात्याविरोधातच घोषणा, शिंदेंची शिवसेना थेट सत्तेतून बाहेर का पडत नाही?", सतेज पाटलांनी डिवचले

"फडणवीसांच्या गृहखात्याविरोधातच घोषणा, शिंदेंची शिवसेना थेट सत्तेतून बाहेर का पडत नाही?", सतेज पाटलांनी डिवचले

Satara ZP Election: सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत सत्तेतील दोन पक्षांमध्ये झुंज बघायला मिळाली. कॅबिनेट मंत्र्यांनाच पोलिसांनी पकडले. या सगळ्या झटापटीनंतरही शिंदेसेना आणि दोन्ही राष्ट्रवादींना सत्ता मिळवता आली नाही. त्याचे पडसाद विधानसभेत आणि विधान परिषदेत उमटले. शिंदेसेनेच्या नेत्यांनी विधिमंडळ परिसरात घोषणाबाजी केली. यावरून काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी शिंदेसेनेला डिवचले. 

राज्यात १२ जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या. पण, त्यात सर्वाधिक चर्चा झाली ती सातारा जिल्हा परिषदेची. सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपा आणि शिंदेसेनेतच राजकीय संघर्ष बघायला मिळाला. पोलिसांच्या मदतीने सत्तेपासून दूर ठेवले गेल्याने शिंदेंसेनेच्या नेत्यांना संताप अनावर झाला आणि त्याचे पडसाद विधानसभा आणि विधान परिषदेत उमटले. 

शिंदेसेनेच्या मंत्र्यांसह आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत गृह विभागाविरोधात घोषणाबाजी केली. त्यावरून काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी शिंदेसेनेला डिवचले आहे.

"थेट सत्तेतून बाहेर का पडत नाही?"

"स्वाभिमान असेल तर सत्तेतून बाहेर पडा!! आज विधानभवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी शिंदे सेनेचे आमदार घोषणाबाजी करत आहेत, तेही सत्ताधारी भाजपच्या आणि त्यातही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अखत्यारीत येणाऱ्या गृहखात्याविरोधात!! जर का लोकशाहीची एवढीच चाड असेल तर नुसत्या घोषणा देण्यापेक्षा आणि पोलिस अधिकाऱ्याचे निलंबन करण्यापेक्षा शिंदेंची शिवसेना थेट सत्तेतून बाहेर का पडत नाही?", असे सतेज पाटील म्हणाले.  

"साताऱ्यातील घटना पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारी नाही, शिवाय महायुतीत सर्व काही अलबेल नाही हेही या घटनेतून अख्ख्या महाराष्ट्रासमोर आले आहे, त्यामुळे शिंदेच्या शिवसेनेने महाराष्ट्राची परंपरा जपण्यासाठी आपला स्वाभिमान दाखवत खरेतर सत्तेतून तत्काळ  बाहेर पडले पाहिजे", असे सतेज पाटील यांनी शिंदेसेनाला सुनावले. 

शंभूराज देसाई, जयकुमार गोरे आमने-सामने

विधान परिषदेत शिंदेसेनेचे कॅबिनेट मंत्री शंभूराज देसाई आणि भाजपाचे कॅबिनेट मंत्री जयकुमार गोरे आमने-सामने आल्याचे दिसले. 

जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत पोलीस अधीक्षकांनी कशा पद्धतीने हस्तक्षेप केला, याचा घटनाक्रम सांगत शंभूराज देसाई यांनी तुषार दोशी यांना निलंबित करण्याची मागणी केली. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दोशी यांचे निलंबन करण्याचे आदेश सरकारला दिले. नीलम गोऱ्हे यांच्या निर्देशानंतर भाजपाचे जयकुमार गोरे यांनी निलंबनाच्या कारवाईला विरोध केला. 

Web Title : सतारा ZP विवाद के बाद गठबंधन पर शिंदे सेना की आलोचना।

Web Summary : सतारा ZP चुनाव विवादों के बाद, शिंदे सेना ने फडणवीस के गृह विभाग का विरोध किया। कांग्रेस के सतेज पाटिल ने भाजपा के साथ उनके गठबंधन पर सवाल उठाया और उनसे आग्रह किया कि यदि उनमें आत्मसम्मान है तो सरकार से बाहर निकलें। विधान परिषद में शिंदे सेना और भाजपा मंत्रियों के बीच तनाव बढ़ गया।

Web Title : Shinde's Sena faces criticism over alliance after Satara ZP clash.

Web Summary : Following Satara ZP election disputes, Shinde Sena protested against Fadnavis's home department. Congress's Satej Patil questioned their alliance with BJP, urging them to exit the government if they have self-respect. Tensions flared between Shinde Sena and BJP ministers in the Legislative Council.