एकाच कुंटुंबातील सहा जणांची आत्महत्या
By Admin | Updated: June 28, 2016 18:29 IST2016-06-28T18:29:03+5:302016-06-28T18:29:03+5:30
स्थानिक काठीपुऱ्यातील रहिवासी चव्हाण कुटुंबातील सहा सदस्यांनी विष प्राशन करून सामूहिक आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास उघडकीस आली.

एकाच कुंटुंबातील सहा जणांची आत्महत्या
- अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथील घटना
अमरावती : स्थानिक काठीपुऱ्यातील रहिवासी चव्हाण कुटुंबातील सहा सदस्यांनी विष प्राशन करून सामूहिक आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास उघडकीस आली. मृतांमध्ये चार भावंड आणि त्यांच्या दोन भाच्यांचा समावेश आहे. सोमवारी रात्रीच या कुटुंबातील सदस्यांनी ‘मोनोक्रोटोफॉस’ नामक विष प्राशन केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
प्रफुल्ल नारायण चव्हाण (४८), विवेक नारायण चव्हाण (४०), लक्ष्मी नारायण चव्हाण (५०), मंगला नारायण चव्हाण (५२), कामिनी अरूण बारड (२९), रोशनी अरूण बारड (२६) अशी मृतांची नावे आहेत. या घटनेने तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. चव्हाण कुटुंबाचे घराशेजारीच किराणा दुकान आहे. या दुकानावरच त्यांचा उदरनिर्वाह होता. आर्थिक तंगीला कंटाळून या कुटुंबाने आत्महत्येचा निर्णय घेतल्याची घटनास्थळी चर्चा होती. पोलिसांनी सहा मृतदेह शासकीय रूग्णालयात शवविच्छेदनासाठी हलविलेत. ठाणेदार सुधीर पाटील यांच्या नेतृत्वात पंचनामा करून पुढील तपास सुरू आहे.