सिंधुदुर्गच्या झेडपी सीईओंची गोंदियाला जिल्हाधिकारी पदावर बढती; चार आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2024 19:15 IST2024-02-01T19:14:51+5:302024-02-01T19:15:18+5:30
राज्यातील चार आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

सिंधुदुर्गच्या झेडपी सीईओंची गोंदियाला जिल्हाधिकारी पदावर बढती; चार आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या
राज्यातील चार आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. सिंधदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांची गोंदियाचे जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे.
तर यवतमाळ झेडपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मेनक घोष यांची धाराशिव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर बदली करण्यात आली आहे.
नाशिकच्या कळवण आणि सहायक जिल्हाधिकारी, कळवण उपविभागात ITDPचे प्रकल्प अधिकारी असलेले विशाल नरवडे यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, बुलढाणा या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. तर गोंदियाचे जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांची सदस्य सचिव, विदर्भ वैधानिक विकास मंडळ, नागपूर येथे नियुक्ती करण्यात आली आहे.