शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
4
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
5
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
6
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
7
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
8
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
9
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
10
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
11
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
12
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
13
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
14
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
15
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
16
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
17
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
18
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
19
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
20
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
Daily Top 2Weekly Top 5

सिंदखेडराजाची ऐतिहासिक तोफ सापडली!

By admin | Updated: December 26, 2014 02:13 IST

राष्ट्रमाता जिजाऊंचे जन्मस्थळ असलेल्या सिंदखेडराजा येथील राजे लखोजीराव जाधव यांच्या राजवाड्यातील शासकीय

सिंदखेडराजा (जि़ बुलडाणा) : राष्ट्रमाता जिजाऊंचे जन्मस्थळ असलेल्या सिंदखेडराजा येथील राजे लखोजीराव जाधव यांच्या राजवाड्यातील शासकीय वस्तु संग्रहालयातून चोरी झालेली ८५ किलो वजनाची पंचधातूची तोफ पोलिसांनी शोधली असून, ही तोफ आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विकण्यात येणार होती, अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे. पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून, त्यांच्या चौकशीतून पुरातन वस्तु खरेदी-विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उघड होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.बुलडाणा जिल्ह्णातील आडगावराजा येथील भुईकोट किल्ल्याचे २० वर्षांपूर्वी उत्खनन केले असता, तेथील १३ एकर परिसरात पंचधातूच्या ८ तोफा सापडल्या होत्या. या तोफा सिंदखेडराजा येथील राजे लखोजीराव जाधव यांच्या राजवाड्यातील शासकीय वस्तु संग्रहालयात ठेवण्यात आल्या होत्या. त्यापैकी ८५ किलो वजनाची पंचधातूची तोफ २२ डिसेंबर रोजी रात्री चोरी झाली होती. ही तोफ चोरण्याचा कट बाळू म्हस्के याने रचला होता. निमगाव वायाळ येथील ट्रॅक्टर चालक आकाश पंजाबराव निलक, दुसरबीड येथील शंकर शिवाजी केवट आणि बाळू म्हस्केचा सख्खा भाचा सिद्धार्थ काळे हादेखील कटात सहभागी होता.त्यांनी १९ डिसेंबर रोजी राजवाड्यात जाऊन तोफ चोरीची रंगीत तालीमही केल्याचे तपासात उघड झाले आहे़२२ डिसेंबर रोजी तिघे पुन्हा एकत्र आले आणि कटानुसार रात्री १२.३० वाजता राजवाड्यातून तोफ लंपास केली. त्यानंतर ही तोफ त्यांनी शिवणीटाका रोडवरील नगरपालिका हद्दीतील एका शेतात पुरून ठेवली. खोदकाम कुणाच्या लक्षात येऊ नये, यासाठी तोफ पुरलेल्या जागेवर सोयाबीनचे कुटार जाळले; मात्र पोलिसांनी ट्रॅक्टरच्या चाकाच्या खुणांचा मागोवा घेत शेतातील जागेचा शोध लावला. त्या जागेवर खोदले असता, पोलिसांना तोफ सापडली. पोलिसांनी शिताफीने तपासचके्र फिरवून, बाळू जगन्नाथ म्हस्के, आकाश संजाबराव निकाळजे, शंकर शिवाजी केवट यांना बुधवारी, तर सिद्धार्थ काळे याला गुरुवारी रात्री ८ वाजता अटक केली. (प्रतिनिधी)