शहरं
Join us  
Trending Stories
1
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
2
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
4
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
5
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
6
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
7
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
8
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
9
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
10
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
11
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
12
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
13
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
14
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
15
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
16
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
17
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
18
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
19
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
20
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...

महाराष्ट्रात निकालानंतर सन्नाटा, हे कसलं द्योतक?; राज ठाकरेंनी व्यक्त केली शंका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 15:06 IST

Raj Thackeray on Maharashtra Election Results: लोकसभेला ज्या अजित पवारांचा १ खासदार निवडून आला त्यांचे ४२ आमदार येतात. काय झाले, कसं झालं हा संशोधनाचा विषय आहे. लोकांनी आपल्याला मतदान केले आहे  फक्त ते आपल्यापर्यंत आले नाही असा आरोप राज ठाकरेंनी केला. 

Raj Thackeray on Election Results:  विधानसभा निवडणूक निकाल लागल्यावर महाराष्ट्रभर सन्नाटा पसरला. लोकांनाच हा निर्णय कळला नाही, पचला नाही. माझ्याकडे संघ परिवाराशी संबंधित एक व्यक्ती आली होती, ते म्हणाले 'इतना सन्नाटा क्यो है भाई, कोई तो जिता होगा... कोणीतरी जिंकलं ना मग जल्लोष का नाही? काही काही गोष्टींवर विश्वासच बसू शकत नाही. आमचे राजू पाटील, त्यांचे गाव आहे तिथे १४०० मतदार आहेत, दरवेळी त्यांना तिथे मतदान होते. त्या गावातून राजू पाटलांना एकही मत पडले नाही. अख्ख्या गावातून एक मत पडत नाही. निकालानंतर सन्नाटा हे कसलं द्योतक असा घणाघात करत मनसे प्रमुख राज ठाकरेंनी विधानसभा निवडणूक निकालांवर भाष्य केले आहे.

वरळी येथे मनसेचा राज्यस्तरीय मेळावा पार पडला. त्यावेळी राज ठाकरे बोलले की,  मराठवाड्यातील आपला पदाधिकारी, तो तिथे नगरसेवक आहे. नगरसेवक झाला तेव्हा त्याला त्याच्या भागातून ५५०० मते आहेत. आता तो विधानसभेला उभा होता, त्याला विधानसभेला अडीच हजार मतदान झाले. निवडून आलेल्यांना विश्वास बसत नाही. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात सात वेळा आमदार झाले. दरवेळी ७०-८० हजार मतांनी निवडून यायचे ते या निवडणुकीत १० हजार मतांनी पराभूत होतात? तुम्ही म्हणाल राज ठाकरेंचा पराभव झाला, म्हणून बोलतोय.. मीच काय असं संपूर्ण महाराष्ट्र बोलतोय. भाजपाला १३२ जागा मिळाल्या, मागील वेळी १०५ मिळाल्या होत्या. २०१४ साली १२२ जागा होत्या. भाजपाचं समजू शकतो, पण अजित पवारांना ४२ जागा कुणाचा तरी विश्वास बसेल का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. 

त्याशिवाय जे इतके वर्ष राजकारण करत आले, ज्यांच्या जीवावर हे लोकं मोठे झाले त्या शरद पवारांना फक्त १० जागा मिळतात.  या सर्व न समजण्यासारख्या गोष्टी आहेत. ४ महिन्यापूर्वी लोकसभा निवडणूक झाली त्यात सर्वाधिक काँग्रेसचे १३ खासदार निवडून आले. एका खासदाराच्या मतदारसंघात ६ आमदार असतात. त्यांचे फक्त १५ आमदार येतात. शरद पवारांचे ८ खासदार निवडून आले, त्यांचे १० आमदार येतात. लोकसभेला ज्या अजित पवारांचा १ खासदार निवडून आला त्यांचे ४२ आमदार येतात. काय झाले, कसं झालं हा संशोधनाचा विषय आहे. लोकांनी आपल्याला मतदान केले आहे  फक्त ते आपल्यापर्यंत आले नाही असा आरोप राज ठाकरेंनी केला. 

दरम्यान, या मतदानावर जाऊ नका लोकांनी आपल्याला मतदान केलं आहे, पण ते मतदान कुठेतरी गायब झालं. अशाप्रकारे निवडणुका लढवल्या जाणार असतील तर निवडणुका लढवायच्या कशा? हे पण निघून जाईल अर्थात. कोणीच अमरपट्टा घेऊन आलेलं नाही. आजपर्यंत पक्षाने जी कामं केली, आंदोलनं केली, ते तुम्ही महाराष्ट्र सैनिकांनी लोकांसमोर मांडलं पाहिजे. तुम्हाला लोकांनी प्रश्न विचारले तर भांबावून जाऊ नका. जाणीवपूर्वक अपप्रचार सुरु असतो त्याला खंबीरपणे उत्तर दिलं पाहिजे. अनेक पत्रकार काही नेत्यांच्या दावणीला बांधले गेलेत. त्यांना उत्तर द्या. हा जाणीवपूर्वक केलेला प्रचार आणि प्रसार असतो, अनेक पत्रकार पक्षाच्या दावणीला बांधलेले असतात. ते चॅनेलमधून, वर्तमानपत्रातून काही गोष्टी पसरवत असतात. त्यात राज ठाकरे भूमिका बदलतात हे सातत्याने बिंबवले जाते असं सांगत राज यांनी आतापर्यंतचा अनेक राजकीय पक्षांचा इतिहास सांगितला. 

छावा सिनेमा पाहायला हवा

परवा छत्रपती संभाजी महाराजांवर सिनेमा करणारे दिग्दर्शक लक्षण उतेकर भेटून गेले. हा सिनेमा खरंच पहा कारण छत्रपती शिवाजी महाराज ही आपली प्रेरणा आहे तर छत्रपती संभाजी महाराज हे आपलं बलिदान आहे. या सिनेमात संभाजी महाराज लेझीम खेळताना दाखवलेत त्यावरून वाद सुरु होता असं मला कळलं. मी दिग्दर्शकांना विचारलं की त्या लेझीम नृत्याने सिनेमा पुढे सरकत नाहीये ना, मग काढून टाका. संभाजी महाराजांवर औरंगजेबाने जे अत्याचार केले ते लोकं बघायला जाणार. लोकांच्या मनात ज्या प्रतिमा असतात तसं दाखवावं असं राज ठाकरेंनी सांगितले.  

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेBJPभाजपाmaharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024