शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
4
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
5
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
6
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
7
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
8
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
9
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
10
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
11
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
12
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
13
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
14
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
15
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
16
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
17
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
18
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
19
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
20
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड

वीज बिलात सवलतीचे संकेत; उद्धव ठाकरे बैठक घेणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2020 6:48 AM

मुख्यमंत्री घेणार स्वतंत्र बैठक; मंत्रिमंडळात चर्चा, पण निर्णय नाही

लोकमत  न्यूज नेटवर्कमुंबई : लॉकडाऊनच्या काळात आकारलेल्या वाढीव बिलात सवलत दिली जाणार नाही, अशी भूमिका ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी घेतली असली तरी या बाबत राज्य सरकार पुनर्विचार करणार असल्याचे संकेत गुरुवारी मिळाले. ऊर्जा मंत्र्यांच्या भूमिकेचे तीव्र पडसाद उमटल्यानंतर या सवलतींबाबत मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली.

विश्वसनीय सूत्रांनी सांगितले की, लोकांच्या भावना तीव्र आहेत आणि सवलती देण्याबाबत फेरविचार झाला पाहिजे अशी मागणी काही मंत्र्यांनी  बैठकीत केली. त्यावर याविषयी राऊत यांच्यासोबत स्वतंत्रपणे बैठक घेऊ, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. विरोधकांच्या हल्ल्यानंतर सरकार नरमाईचे धोरण घेणार, असे दिसते.  

राऊत यांनी गुरुवारी अर्थमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आणि लॉकडाऊन काळातील ३ महिन्यांच्या वीज बिलात सवलती देण्यासाठी ऊर्जा विभागाने दिलेल्या निधीच्या प्रस्तावावर विचार करण्याची मागणी त्यांनी केली. मंत्रिमंडळ बैठकीत मुख्य सचिव संजय कुमार यांनी महाविकास आघाडी सरकारने गेल्या वर्षभरात घेतलेले निर्णय आणि त्यांची अंमलबजावणी यासंदर्भात सादरीकरण केले.

१,८०० कोटी रुपयांची ऊर्जा विभागाची मागणी आहे. आर्थिक अडचणीमुळे एवढी रक्कम देण्याबाबत अजित पवार राजी नसल्याचे समजते. आता मुख्यमंत्र्यांच्या  भूमिकेकडे सर्वांचे लक्ष आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणelectricityवीजUddhav Thackerayउद्धव ठाकरे