धक्कादायक; विजेचा धक्का लागून चुलत्यासह पुतण्याचा दुदैवी मृत्यू

By appasaheb.patil | Published: October 19, 2019 10:42 AM2019-10-19T10:42:38+5:302019-10-19T10:46:31+5:30

मंगळवेढा तालुक्यातील खुपसंगी गावातील घटना; याच घटनेत दहा शेळ्यांचाही झाला मृत्यू

Shocking; The unfortunate death of a stoneworker by the lightning strike | धक्कादायक; विजेचा धक्का लागून चुलत्यासह पुतण्याचा दुदैवी मृत्यू

धक्कादायक; विजेचा धक्का लागून चुलत्यासह पुतण्याचा दुदैवी मृत्यू

Next
ठळक मुद्दे- मंगळवेढा तालुक्यात शुक्रवारी मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस- विजेचा धक्का लागून दोघांचा मृत्यू झाल्याने गावात हळहळ- महावितरणच्या अधिकाºयांसह पोलीसांनी दिली घटनास्थळला भेट

सोलापूर/ मंगळवेढा : पावसाचा शेळ्या का ओरडू लागल्या हे पाहण्यासाठी गेलेल्या खुपसंगी (ता़ मंगळवेढा) येथील दोघांना विजेचा शॉक लागला़ या घटनेत दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली़ याच घटनेत दहा शेळ्यांचाही मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

तुकाराम सोमा चौगुले (६०) व सोमा दगडू चौगुले (वय ४५) असे ठार झालेल्या दोघांची नावे आहेत.

याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास खुपसंगी येथे पावसाला सुरूवात झाली़ रात्री बाराच्या नंतर पावसाने चांगलाच जोर धरला होता़ त्याचवेळी तुकाराम चौगुले यांच्या शेळ्यांच्या गोटातील शेळ्या ओरडू लागल्याने तुकाराम सोमा चौगुले हे पाहण्यासाठी गेले असता त्यांना विजेचा शॉक बसला. त्यावेळी घरातील लोकांनी आरडाओरडा सुरू केली़ शेजारीच राहत असलेल्या सोमा चौगुले हा झोपत असताना चुलता तुकाराम चौगुले यांना काय झाले हे पाहण्यासाठी गेले होते. चुलता तुकाराम चौगुले यांना गोट्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करीत असताना सोमा चौगुले यालाही विजेचा शॉक बसला. त्यामुळे तोही जागीच मयत झाला. 
या घटनेनंतर महावितरणचे अधिकारी संजय शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी दत्तात्रय पाटील, पोलीस निरीक्षक अनिल झाडे यांनी घटनास्थळी भेट दिली.



 

Web Title: Shocking; The unfortunate death of a stoneworker by the lightning strike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.