शिवसेनेची सुवर्णमहोत्सवाची जय्यत तयारी

By Admin | Updated: June 17, 2015 03:07 IST2015-06-17T03:07:34+5:302015-06-17T03:07:34+5:30

शिवसेना येत्या १९ जूनला सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे.

Shivsena's Golden Jubilee Celebration | शिवसेनेची सुवर्णमहोत्सवाची जय्यत तयारी

शिवसेनेची सुवर्णमहोत्सवाची जय्यत तयारी

मुंबई : शिवसेना येत्या १९ जूनला सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे. यानिमित्त समाजोपयोगी कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. उत्सवी सोहळे न करता जनतेच्या कल्याणासाठी शिवप्रकाश, शिवजलक्रांती, शुद्ध पेयजल आणि ई-प्रबोधन या योजना सेनेचे आमदार, खासदार राबविणार आहेत.
शिवप्रकाश योजनेंतर्गत सुमारे २०० गावांमध्ये सौरऊर्जेवर चालणारे पथदिवे पुरविण्यात येणार आहेत. १८ जून रोजी खालापूर तालुक्यातील उंबरणे, पिरकर या गावी शिवप्रकाश योजनेचा शुभारंभ उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. (प्रतिनिधी )

Web Title: Shivsena's Golden Jubilee Celebration