शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

...म्हणजे रेड्याकडून दुधाची अपेक्षा करण्यासारखेच; उद्धव ठाकरेंचा भाजपा-शिंदे गटावर घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2022 08:22 IST

साधूंची भगवी वस्त्र् आताही रक्ताने भिजलीच, साधूंची डोकी फुटली, बरेच काही झाले. तरीही भाजपचे हिंदुत्व झंडू बाम चोळत पडले आहे. यालाच आम्ही ढोंगी हिंदुत्व म्हणतो

मुंबई - शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सोबत सत्ता स्थापन केल्याने हिंदुत्व सुटले म्हणून आम्ही शिवसेनेशी बेइमानी केली, असे सांगणाऱ्या त्या चाळीस लफंग्यांना सांगली जिल्हय़ातील लवंगा गावातील भगव्या साधूंचा करुण आक्रोश ऐकू गेला नाही. अर्थात अशा ढोंगी बनावट मंबाजींकडून हिंदुत्वाची अपेक्षा करणे म्हणजे रेड्याकडून दुधाची अपेक्षा करण्यासारखेच आहे अशी घणाघाती टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना अग्रलेखातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपावर केली आहे. 

तसेच भाजपचे कळसूत्री बाहुले ‘मा.मु.’साहेब ‘हिंदू गर्व यात्रा’ काढणार आहेत. सांगलीतील साधुकांडावर यांनी ‘ब्र’ काढला नाही हे विशेष. ‘मा.मु.’ साहेबांना भाजपने हिंदूंचे तीर्थराज म्हणूनच काय ते घोषित करावे. तेवढेच काय ते आता बाकी उरले आहे! राज्यातील कायदा-सुव्यवस्थेची भगवी लक्तरे सांगलीच्या वेशीवर टांगलेली स्पष्ट दिसत आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळातील पालघरच्या साधुकांडाचे घाणेरडे राजकारण करणारे आज सत्तेत आहेत असा टोलाही शिवसेनेने लगावला. 

सामना अग्रलेखातील महत्त्वाचे मुद्दे हिंदू म्हणजे एक नंबरचे ढोंगी आहेत, असे एक विधान गुजरातचे राज्यपाल देवदत्त आचार्य यांनी केले. बरे, आचार्य हे काय कोणी ‘सेक्युलर’ वगैरे वेगळय़ा विचारांचे माणूस नाहीत. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी गाठ मारलेले पक्के हिंदुत्ववादी आहेत. त्यांचे हे वक्तव्य आश्चर्यकारक असले तरी ते महाराष्ट्रातील भाजप व शिंदे गटवाल्यांसाठी तंतोतंत लागू पडते. 

महाराष्ट्रातील सांगली जिल्हय़ात 13 सप्टेंबर रोजी एक भयंकर ‘साधुकांड’ घडले. मथुरेतून चार साधू भगव्या वस्त्रात, गळय़ांत व हातात रुद्राक्षमाळा, अंगभर भस्म, चंदन लावून महाराष्ट्राच्या हद्दीत आले. त्यांना पंढरपूर येथे जायचे होते, पण सांगली जिल्हय़ातील जत तालुक्यातील लवंगा गावात त्यांच्या वाहनाने प्रवेश करताच गावातील मोठय़ा जमावाने त्यांच्यावर सामुदायिक हल्ला केला. 

साधू जखमी झाले, मरणासन्न अवस्थेत पडले. नशीब बलवत्तर म्हणूनच त्यांचे प्राण वाचले. म्हणजे शिंदे-फडणवीसांच्या राज्यात भगव्या कपडय़ांतील साधूंना ठारच मारण्याचे कारस्थान होते. गावकऱ्यांना वाटले हे साधू म्हणजे मुले पळविणारी चोरांची टोळीच आहे. त्यामुळे त्या साधूंवर सामुदायिक हल्ला झाला. 

याप्रकरणी आता पाच-सात जणांना पोलिसांनी अटक केली असली तरी स्वतःला हिंदुत्वाचे ‘नवतारणहार’ म्हणवून घेणाऱ्या राज्य सरकारला हे साधुकांड गंभीर वाटू नये याचे आश्चर्य आम्हाला वाटले. सध्याच्या राज्यकर्त्यांचे हिंदुत्व ढोंगी आहे असे आम्ही म्हणतो 

साधारण दोनेक वर्षांपूर्वी पालघर जिल्हय़ातील गडचिंचले गावात असेच एक साधुकांड घडले होते. त्या वेळी महाराष्ट्रातले हे चार साधू उत्तर प्रदेशात निघाले होते. गुजरातची सीमा पार करताना ते रस्ता चुकले व दुसऱ्याच गावात जाऊन भरकटले. ते ज्या गावात रात्री भरकटले त्या गावातही चार दिवसांपासून अशी अफवा जोरात होती की, साधूंच्या वेशातील मुले पळवणारी टोळी गावात येणार आहे. त्यामुळे दिवस-रात्र संपूर्ण गाव पहाऱ्यावरच होते. 

अशातच हे भरकटलेले साधू त्या गावात पोहोचले व गावकऱ्यांच्या रोषाला बळी पडले. सांगलीतील लवंगा गावात साधूंना ज्या पद्धतीने मारहाण झाली तशीच मारहाण पालघरमधील रस्ता भरकटलेल्या साधूंना झाली. पंढरपूरकडे निघालेल्या साधूंचे प्राण वाचले हे सुदैव, पण उत्तरेकडे निघालेले साधू पालघर जिल्हय़ातील गावकऱ्यांच्या हल्ल्यात मरण पावले. 

अर्थात या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यावेळी पोलीस वेळीच घटनास्थळी पोहोचले होते. पुढे साधूंना मारहाण झाली त्या गावातील गर्दीला आरोपी केले गेले. सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल झाले. त्यावेळचे गृहमंत्री अनिल देशमुख स्वतः तत्काळ घटनास्थळी पोहोचले, पण त्या घटनेचे तेव्हा विरोधी पक्षात असलेल्या भाजपने मोठय़ा प्रमाणात राजकीय भांडवल केले. अर्थात त्यावेळचा त्यांचा तो कथित अन्याय-अत्याचाराविरुद्धचा जोश सांगलीच्या साधुकांडात मात्र पातळ झालेला दिसतो. पालघरमधील साधुकांडावर राष्ट्रीय ‘गोदी’ मीडियाने तर चर्चा आणि धिक्काराचा नुसता हैदोस घातला होता. महाराष्ट्रात हिंदुत्व नष्ट झाले. साधूंच्या हत्येमुळे शिवसेनेने हिंदुत्व काँग्रेस-राष्ट्रवादीच्या खुंटीस टांगून ठेवले असे तीर चालवले गेले. 

पालघरच्या हत्याकांडामुळे सोनिया गांधी व रोमचे व्हॅटिकन चर्च कसे खूश आहे वगैरे बतावण्या भाजपचे प्रवक्ते तेव्हा करीत होते. विरोधी पक्षनेते फडणवीस, शेलार वगैरे महामंडळी तर रडून रडून मोडूनच पडली होती. या मंडळींनी घटनास्थळी दौरे काढून प्रशासनावर दबावच आणला होता. अगदी प्रकरण सीबीआय, एनआयएकडे देण्यापर्यंत मागण्या झाल्या. 

प्रत्येक भाजपवाला तेव्हा पालघरच्या साधुकांडावर आपले ज्वलंत विचार मांडून शोकमग्नतेचे दर्शन घडवीत होता. मग ही शोकमग्नता, ती आपटाआपटी सांगलीच्या साधुकांडात का बरे दिसू नये? पालघरचे साधू हिंदू आणि सांगलीतले मार खाल्लेले साधू भगव्या वेशातले ‘अरबी’ होते काय? की त्यांनीही पालघरमधील साधूंप्रमाणे मरायला हवे होते? 

पालघरच्या साधुकांडानंतर हिंदुत्वाच्या नावाने फुरफुरणारी घोडी सांगली प्रकरणात ‘लीद’ टाकत आहेत. भाजपचे ते सर्व हिंदुत्ववादी ताई, माई, बाई मंडळही लवंग्यातील साधुकांडावर बोलताना, रडताना दिसत नाहीत. ते रविशंकर प्रसाद, गिरिराज शंकर, कोणीएक सांबीत पात्रा सांगली साधुकांडात छाती पिटताना दिसू नयेत याचे आश्चर्यच म्हणायला हवे. 

एका गणपती मिरवणुकीत अफझलखान वधाच्या देखाव्यावरून सांगली-मिरज भागात दंगल उसळली. त्या दंगलीत ज्यांनी हिंदुत्वाच्या समशेरी नाचवल्या ते सांगलीतले सर्व हिंदू वीरही साधुकांडानंतर चिडीचूपच झाले आहेत. नाही म्हणायला गृहमंत्री फडणवीसांनी साधुकांडाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. काही लोकांना अटकाही झाल्या आहेत, पण मग असेच चौकशीचे आदेश आणि कारवाई तर पालघर साधू मारहाणप्रकरणी तत्कालीन ‘ठाकरे सरकार’नेही केलीच होती. 

पालघरच्या पोलीस अधीक्षकांना पदावरून हटवले होते, पण तरीही ‘ठाकरे सरकार’विरोधात हिंदुत्वाच्या नावाने नुसते काहूर माजवले होते. देशभरातील भाजपने या प्रश्नी थयथयाटच केला होता, पण भाजपच्या ढोंग्यांनो, आता तर तुमच्याच राज्यात साधूंवर निर्घृण, अमानुष हल्ले झाले. माऊलीच्या कृपेने ते वाचले, पण म्हणून गुन्हय़ाची तीक्रता कमी होत नाही. साधूंची भगवी वस्त्र् आताही रक्ताने भिजलीच, साधूंची डोकी फुटली, बरेच काही झाले. तरीही भाजपचे हिंदुत्व झंडू बाम चोळत पडले आहे. यालाच आम्ही ढोंगी हिंदुत्व म्हणतो

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाHinduहिंदूBJPभाजपाUddhav Thackerayउद्धव ठाकरे