शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

वंचित आघाडी मविआसोबत न आल्याने फटका बसणार का?; उद्धव ठाकरेंनी दिलं थेट उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2024 15:11 IST

Lok Sabha Election 2024: वंचित आघाडी वेगळी लढण्याने मविआला फटका बसेल का, असा प्रश्न यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना विचारण्यात आला.

Uddhav Thackeray ( Marathi News ) : महाविकास आघाडीची आज मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद पार पडली असून या पत्रकार परिषदेतून लोकसभा निवडणुकीसाठी मविआचा जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर करण्यात आला. आघाडीच्या जागावाटपात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला २१, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला १० आणि काँग्रेसला १७ जागा देण्यात आल्याचं यावेळी घोषित करण्यात आलं आहे. तसंच या तीन प्रमुख पक्षांसह माकप, समाजवादी पक्ष, शेतकरी कामगार पक्ष हेदेखील महाविकास आघाडीचे घटकपक्ष असतील, असं यावेळी मविआ नेत्यांनी सांगितलं. मात्र प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्यास महाविकास आघाडीला अपयश आलं आहे. वंचित आघाडी वेगळी लढण्याने मविआला फटका बसेल का, असा प्रश्न यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना विचारण्यात आला असता त्यांनी याबाबत आपली भूमिका मांडली आहे.

वंचित बहुजन आघाडीबद्दल बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, "ही महाविकास आघाडी जास्तीत जास्त व्यापक कशी होईल, त्यादृष्टीने आम्ही आटोकाट प्रयत्न केले. मला आमच्यासोबत आलेल्या इतर छोट्या पक्षांना धन्यवाद द्यायचे आहेत. कारण देशाचे संविधान वाचवण्यासाठी आम्ही जी ताकद उभी करतोय त्या ताकदीत या इतर पक्षांनी भर घातली. एकही जागा न मागता त्यांनी ही भूमिका स्वीकारली. आम्हाला अशी अपेक्षा होती की प्रकाश आंबेडकर हेदेखील आमच्यासोबत येतील,  त्यांना काही जागा देऊ केल्या होत्या. मात्र दुर्दैवाने ते काही शक्य झालं नाही. आम्ही याआधीच आमची भूमिका स्पष्ट केलीय की, आंबेडकर यांनी आमच्यावर काहीही टीका केली तर आम्ही त्या टीकेला उत्तर देणार नाही. कारण त्यांच्याबद्दल आमच्या मनात प्रेम आणि आदर होता, तो आदर आजही कायम आहे. संविधान रक्षणासाठी त्यांनी भूमिका घ्यावी, असं आमचं आजही मत आहे," असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

प्रकाश आंबेडकरांनी ठाकरे-पवारांना काय सल्ला दिला?

प्रकाश आंबेडकर यांनी कालच प्रसारमाध्यमांशी बोलताना मविआ नेत्यांवर निशाणा साधला. "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीने स्वतःमध्ये बदल केले नाही तर त्यांची इतर राजकीय संघटना आणि पक्षांसारखीच वाताहत होणार आहे. या निवडणुकीनंतर राज्यातील राजकारणातील बऱ्याच गोष्टींमध्ये बदल होतील," असं आंबेडकर म्हणाले. तसंच "महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या फॉर्म्युल्यावर एकमत न झाल्याने वंचितने प्रस्ताव फेटाळला. वंचित आणि महाविकास आघाडीचा मार्ग पूर्णपणे वेगळा झाला असून आता प्रचाराला सुरुवात झाल्याने महाविकास आघाडीचा विषय संपला," असंही आंबेडकर म्हणाले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४