Sushma Andhare : "टायगर इज बॅक"; संजय राऊतांना जामीन मिळाल्यावर सुषमा अंधारेंची पहिली प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2022 14:15 IST2022-11-09T14:05:48+5:302022-11-09T14:15:48+5:30
Sushma Andhare And Sanjay Raut : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी संजय राऊत यांना जामीन मिळाल्यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

Sushma Andhare : "टायगर इज बॅक"; संजय राऊतांना जामीन मिळाल्यावर सुषमा अंधारेंची पहिली प्रतिक्रिया
पत्राचाळ प्रकरणात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांना पीएमएलए कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. १०० दिवसानंतर राऊत यांना जामीन मंजूर झाला आहे. संजय राऊत हे कथित पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी न्यायलयीन कोठडीत गेल्या १०० दिवसापासून होते. संजय राऊत यांनी जामीन मिळण्यासाठी कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. यावर त्यांना आज जामीन मंजूर केला आहे. यानंतर आता यावर प्रतिक्रिया येत आहेत.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी संजय राऊत यांना जामीन मिळाल्यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "टायगर इज बॅक" असं सुषमा अंधारे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. संजय राऊतांच्या जामिनासंदर्भात ईडीने लेखी उत्तर सादर केले होते.
Tiger is back... !!!! @AUThackeray@SaamanaOnline
— SushmaTai Andhare (@andharesushama) November 9, 2022
जामिनावरील निकाल न्यायालयाने राखून ठेवला होता. याच दरम्यान, संजय राऊतांना कथित पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने अटक केली होती. विशेष म्हणजे प्रविण राऊत आणि संजय राऊत यांच्या जामीनावर एकाच दिवशी आज 9 नोव्हेंबरला कोर्ट निर्णय देण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण?
पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना 31 जुलै रोजी रात्री उशिरा ईडीने अटक केली होती. त्यानंतर संजय राऊत यांना प्रथम ईडी आणि त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली, तेव्हापासून संजय राऊत आर्थर रोड कारागृहात आहेत. ईडीने संजय राऊत यांचा पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांचा थेट हात असल्याचा आरोप केला. प्रविण राऊत पत्राचाळ डेव्हलेपमेंट पाहत होते.