शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुमचं वक्तव्य लाजिरवाणं, आम्ही हमासचे दहशतवादी मारले", प्रियंका गांधींच्या 'त्या' दाव्यामुळे इस्राइल संतप्त   
2
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
3
शुबमन गिलची हवा! इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या कॅप्टनला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
4
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
5
व्हायरल होण्याचं भूत, मिठी मारुन कपलची कालव्यात उडी; Video पाहून वाढेल हृदयाची धडधड
6
"भावांनो, असं आयुष्य कोण जगेल..."; कौटुंबिक वादातून पतीनं संपवलं जीवन, मृत्यूपूर्वी दीड मिनिटांचा Video
7
खऱ्याखुऱ्या विराट कोहलीने पान टपरीवाल्याला केला कॉल, नंतर पोलीस त्याच्या घरी पोहचले अन्...
8
ट्रम्प यांच्या ५०% टॅरिफनं मुकेश अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर घसरला? ₹१७ वर आला भाव!
9
Janmashtami 2025: बाळाला कृष्णाचे नाव ठेवायचंय? ही घ्या १०८ नावांची यादी; अगदी मुलींचीह!
10
HDFC-ICICI बँकेच्या शेअर्समुळे बाजार गडगडला! पण, 'या' क्षेत्राने दिली साथ; कशात झाली वाढ?
11
माझा काही संबंध नाही, काँग्रेसने परवानगीशिवाय 'तो' व्हिडिओ वापरला; केके मेननचे स्पष्टीकरण
12
Maharashtra Police Bharti 2025: १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
13
शाओमी YU7 च्या खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड, अवघ्या दोन मिनिटांत ३ लाख बुकींग!
14
१९ वर्षे असते शनि महादशा, ‘या’ राशींना मिळतो अपार पैसा, भाग्योदय; भरभराट, भरघोस लाभच लाभ!
15
धक्कादायक! लोकोपायलटच्या जाग्यावर तिसराच व्यक्ती बसला, मोठा गोंधळ उडाला, अनेकांचा जीव धोक्यात; व्हिडीओ व्हायरल
16
"तिसरं मूल झाल्यास गाय अन् ५०००० रुपयांचं बक्षीस"; घोषणा करणाऱ्या खासदाराचं पंतप्रधान मोदींनी केलं कौतुक!
17
प्रेमविवाहानंतर अवघ्या १० दिवसांत पत्नीचा काटा काढला; पोलीस शिपाई का बनला गुन्हेगार?
18
पैशांचा पाऊस! अदानींच्या संपत्तीत एका दिवसात ५० हजार कोटींची वाढ, टॉप-२० श्रीमंतांच्या यादीत पुन्हा स्थान!
19
Video: एकाच महिलेचं ६ वेळा मतदार यादीत नाव, EPIC क्रमांक वेगळे...; महाराष्ट्रातील प्रकार व्हायरल
20
एका झटक्यात ₹४००० नं घसरला शेअरचा भाव; शेअर विकण्यासाठी गुंतवणुकदारांच्या रांगा, पाहा कोणता आहे स्टॉक?

"सरकार टिकेल किंवा जाईल, पण...", संजय राऊतांचा भाजपवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2022 11:03 IST

Sanjay Raut Tweet : नारायण राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना धमकी दिली आहे. नारायण राणे यांच्या धमकीचा समाचार घेत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत भाजपवर निशाणा साधला आहे.

मुंबई : राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अनेक नाट्यमय घडामोडी घडत असल्याचे पाहायला मिळत आहे. यातच बंडखोर आमदार हे सभागृहात येणारच आहेत आणि त्यांच्या मनाप्रमाणे मतदान करणार आहे, त्यांच्या केसालाही धक्का लावल्यास घर गाठणे कठीण होईल, अशी थेट धमकी ट्विटद्वारे केंद्रीय मंत्री नारायण  राणे (Narayan Rane) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना धमकी दिली आहे. त्यामुळे राजकारणात एकच खळबळ माजली. आता नारायण राणे यांच्या याच धमकीचा समाचार घेत शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ट्विट करत भाजपवर निशाणा साधला आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत म्हटले आहे की, "महाविकास आघाडीचे सरकार वाचवण्याचा प्रयत्न केला तर शरद पवार यांना घरी जाऊ देणार नाही. रस्त्यात अडवू, अशी धमकी भाजपचा एक केंद्रीय मंत्री देतो. ही भाजपची अधिकृत भूमिका असेल तर तसे जाहीर करा. सरकार टिकेल किंवा जाईल... पण शरद पवार यांच्या बाबत अशी भाषा महाराष्ट्राला मान्य नाही." तसेच, संजय राऊत यांनी हे ट्विट पीएमओला (@PMOIndia) टॅग केले आहे.

दरम्यान, शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेचे वरिष्ठ नेतृत्त्व कमालीचे अस्वस्थ झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची साथ सोडून जाणाऱ्या आमदारांची संख्या वाढत असताना दुसरीकडे एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देणाऱ्या आमदारांच्या संख्येत वाढ झाली आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला खिंडार पाडत जवळपास ४० हून अधिक आमदारांचा एक मोठा गट आपल्या सोबत उभा केला आहे. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर होण्याची चिन्हे आहेत. 

काय म्हणाले शरद पवार आणि नारायण राणे? राज्यातील राजकीय घडामोडींवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत गुरुवारी माध्यमांशी संवाद साधला आणि आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी "बाहेर गेलेले आमदार राज्यात परतल्यानंतर शिवसेनेसोबत असतील असा विश्वास वाटत आहे. विधानसभेत ज्या वेळी बहुमत चाचणी होईल त्यावेळी समजेल हे सरकार बहुमतात आहे. अशी स्थिती मी महाराष्ट्रात याआधी अनेकदा पाहिली आहे. आताच्या परिस्थितीवर मात करुन हे सरकार कायम राहिल असा विश्वास आहे. जे लोक बाहेर गेले, त्यांच्या नेत्याचे म्हणणे आहे की काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सत्तेत असल्याने ते नाराज आहेत. मग ही नाराजी या आधी का काढली नाही? हिंदुत्वाचा मुद्दा या आधी का काढला नाही? संजय राऊत यांनी त्यांना इकडे येऊन भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले. त्यामुळे बहुमत सिद्ध करण्यासाठी त्यांना इकडे यावेच लागेल", असे शरद पवार यांनी म्हटले आहे. दरम्यान, शरद पवारांच्या पत्रकार परिषदेनंतर नारायण राणेंनी एक ट्विट केले आहे. त्यामध्ये नारायण राणे यांनी म्हटले आहे की, "माननीय शरद पवार साहेब या सर्वांना धमक्या देत आहेत, 'सभागृहात येऊन दाखवा', ते येणारच आहेत. ते येणार आणि त्यांच्या मनाप्रमाणे मतदान करणार. त्यांच्या केसालाही धक्का लावल्यास घर गाठणे कठीण होईल."

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतSharad Pawarशरद पवारShiv SenaशिवसेनाNarayan Raneनारायण राणे Eknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपा