Sanjay Raut in jail: सुनील राऊत आणि अनिल देसाईंना रोखले; संजय राऊतांना भेटण्यास तुरुंग प्रशासनाची स्पष्ट मनाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2022 15:04 IST2022-08-10T15:03:29+5:302022-08-10T15:04:10+5:30
आमदार सुनील राऊत आणि खासदार अनिल देसाई यांना तुरुंग प्रशासनाने संजय राऊतांना भेटू दिले नाही.

Sanjay Raut in jail: सुनील राऊत आणि अनिल देसाईंना रोखले; संजय राऊतांना भेटण्यास तुरुंग प्रशासनाची स्पष्ट मनाई
मुंबईः शिवसेना नेते संजय राऊत यांना 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. मुंबईतील आर्थर रोड जेलमध्ये त्यांचा मुक्काम असेल. दरम्यान, कोणत्याच व्यक्तीला संजय राऊत (Sanjay Raut) यांना भेटू दिले जात नाहीये. संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊत (Sunil Raut) यांनाही तुरुंग प्रशासनाने भेटीची परवानगी नाकारली.
आज सकाळी संजय राऊत यांचे धाकटे बंधू आणि शिवसेना आमदार सुनील राऊत खासदार अनिल देसाईसह संजय राऊत यांना भेटण्यासाठी आर्थर रोड कारागृहात गेले होते. मात्र तुरुंग प्रशासाने त्यांना स्पष्ट शब्दात नकार दिली. न्यायालयाकडून रीतसर परवानगी आणल्यानंतरच संजय राऊतांना भेटू दिले जाईल, असे कारागृह प्रशासनाने सांगितले. संजय राऊत यांच्यावर पत्रावाला चाळ प्रकरणात ही कारवाई झाली आहे.
काय म्हणाले सुनील राऊत?
तुरुंग प्रशासनाने भेट नाकारल्यानंतर सुनील राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, 'आमची कोर्टात लढाई सुरू आहे. वकिलांशी भेटून आम्ही योग्य तो निर्णय घेऊ. ते काहीही करू शकतात. सज्जन माणसाला अडकवू शकतात, चांगल्या माणसाची जिंदगी बरबाद करू शकतात. त्यांच्याकडून याच अपेक्षा आहे. सत्य परेशान हो सकता है..पर पराजित नही. एक वरची शक्ती काम करत असते, त्यामुळे हे चाललंय. एक दिवस सगळं उलटं फिरेल', असा इशारा सुनील राऊत यांनी यावेळी दिला.
जामीन कधी मिळणार ?
पत्रावाला चाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीने चौकशीसाठी ताब्यात घेतले. 08 ऑगस्ट रोजी त्यांची ईडी कोठडी संपली. त्यानंतर त्यांना कोर्टाने त्यांना न्यायालयीन कोठडी दिली. संजय राऊतांना 22 ऑगस्टपर्यंत म्हणजेच आणखी 12 दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवले जाईल. दरम्यान शिवसेना नेते आणि राऊतांचे बंधू सुनील राऊत हे संजय राऊतांच्या जामीनासाठी प्रयत्न करत आहेत.